दिंडोरी

नाशिक : दोन्ही थडीवर पाय ठेवत टाकलेले फासे उलटे पडल्याने दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे (अजित पवार) नरहरी झिरवळ यांचा सामना आता राष्ट्रवादीच्या (शरद पवार) सुनीता चारोस्कर यांच्याशी होत आहे. लोकसभा निवडणुकीत झिरवळ यांचे गुरू शरद पवार यांनी कृषिबहुल भागात आपला प्रभाव दाखवला होता. तो निष्प्रभ करण्याचे आव्हान झिरवळांसमोर आहे. बंडखोरी, नामसाधर्म्य असणारा उमेदवार आणि त्याला मिळालेले ‘पिपाणी’सदृश ‘ट्रम्पेट’ चिन्ह शरद पवार गटाची डोकेदुखी ठरू शकते.

maharashtra assembly election 2024 srijaya chavan vs tirupati kadam kondhekar bhokar assembly constituency
लक्षवेधी लढत : मुलीसाठी अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

मतदारसंघ पुनर्रचनेत २००९ मध्ये दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघात पेठ तालुका समाविष्ट झाला. तेव्हा एकसंध शिवसेनेने अत्यल्प मतांनी विजय मिळवला होता. त्यापुढील दोन्ही निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीच्या झिरवळांनी ही जागा राखली. पक्षांतर, लोकसभा निवडणुकीत बदललेल्या समीकरणांनी हॅट् ट्रिक साधणे त्यांच्यासाठी तितके सोपे राहिलेले नाही.

प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचा उमेदवार आपल्या घरातील राहील, यासाठी झिरवळ यांनी आटोकाट प्रयत्न केले. अजित पवार गटात असूनही स्वत:च्या फलकांवर शरद पवार यांची छायाचित्रे झळकवली. मात्र, शरद पवार गटाने उमेदवार निवडीत झिरवळ यांच्या मुलास काडीची किंमत दिली नाही. लोकसभेत भाजपचा उमेदवार होता. यावेळी अजित पवार गटाचा थेट सामना शरद पवार गटाशी आहे. झिरवळ यांना शिवसेनेच्या (शिंदे) धनराज महालेंची अखेरच्या क्षणी टळलेली बंडखोरी, हाच काय तो दिलासा.

हेही वाचा >>> व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे सर्वच पक्षांची धाव!

मतदारसंघात साखर कारखाना, बाजार समिती आणि सहकारी संस्थांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’च्या भास्कर भगरे यांना दिंडोरी विधानसभेत तब्बल ८२ हजारांहून अधिकची आघाडी मिळाली होती. त्यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या अपक्ष उमेदवारास ‘पिपाणी’सदृश ट्रम्पेट चिन्हावर २७ हजार ४४२ मते मिळाली. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही तसाच प्रयोग झाला आहे. काही भागात ‘माकप’चे प्राबल्य आहे.

निर्णायक मुद्दे

● जवळपास ६० टक्के आदिवासी मतदार असणाऱ्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व कोण करणार, हे निश्चित करण्यात उर्वरित ४० टक्के मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

● कांदा, टोमॅटो, द्राक्ष आणि ऊस पिकवणाऱ्या भागात कृषिमालाच्या दरातील चढ-उतार कळीचा विषय आहे. मुबलक पाणी असूनही नियोजनाच्या अभाव आहे.

● नव्याने आकारास आलेल्या औद्याोगिक वसाहतीत मोठे उद्याोग हळूहळू स्थिरावत आहेत, पण स्थानिकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते.

● झिरवळ हे कोकणा तर चारोस्कर हे कोळी समाजाचे आहेत. वर्चस्वासाठी दोन्ही समाजांत राजकीय लढाई ठरलेली असते. कोळी समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने मत विभाजनाचे आव्हान आहे.