पालघर : विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात असणाऱ्या प्रस्थापितांविरुद्ध कौल दिला असून लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले आहे. बहुजन विकास आघाडीला आगामी काळात अस्तित्वासाठी लढाई करावी लागणार असून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेस पक्षाला पक्षाची पुनर्बांधणी करणे आवश्यक ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या निवडणुकीत वसई, नालासोपारा, बोईसर, विक्रमगड व डहाणू या ठिकाणी विद्यमान आमदार यांना निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली. बहुजन विकास आघाडीचे प्रतिनिधित्व असणाऱ्या तीन मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत तर उर्वरित तीन ठिकाणी आमने-सामने लढती झाल्या.

मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे डॉ. हेमंत सवरा (भाजपा) यांनी महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता. या पराभवाला महायुतीने घडविलेले अर्थकारण हे प्रमुख कारण पुढे करण्यात आले होते. विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणात खर्च करू शकणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र विधानसभा निवडणुकीत रसदेची अतिवृष्टी झाल्याचे चित्र बहुतांश मतदारसंघात दिसून आले. मतदारांची लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाताना मानसिकता वेगळी असते अशी सबब पुढे करण्यात येत होती. मात्र या निवडणुकीला सामोरे जाताना महायुती व्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष गाफील राहिल्याचे दिसून आले.

हेही वाचा – भाजपच्या मावळ्यांनी राखला फडणवीसांचा गड

लोकसभा निवडणुकीच्या सुमारे वर्षभर पूर्वीचा कालावधी तसेच लोकसभा निवडणूक झाल्यापासून विधानसभा निवडणुकीपर्यंत वेगवान पद्धतीने सुरू असलेल्या मतदार नोंदणीकडे भाजपा व्यतिरिक्त इतर प्रमुख राजकीय पक्षांनी विशेष गांभीर्याने लक्ष दिले न्हवते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत केली. त्यामुळे भाजपाने जिल्ह्यात चार जागा आपल्या जीवावर लढवताना शिवसेना (शिंदे) पक्षाला देण्यात आलेल्या दोन जागांवर भाजपाचे उमेदवार निर्यात करण्यात आले होते.

महाविकास आघाडीतर्फे पालघर व बोईसर जागा लढवणाऱ्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने उमेदवारांची निवड करताना आवश्यक अभ्यास करण्यात आला नव्हता. त्याचप्रमाणे शिवसेनेतील फुटीनंतर खिळखिळी झालेल्या पक्ष संघटनेकडून आवश्यक सहकार्य लाभले नाही. त्यात विधानसभा निवडणुकीच्या दीड महिनापूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने जिल्हाप्रमुखांना बदलल्याने नव्याने पक्ष बांधणी होऊ शकली नाही. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आवश्यक समन्वय व सहकार्य लाभले नसल्याचे दिसून आले. पालघरची जागा बहुजन विकास आघाडीने लढवली नाही तर बोईसर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची पक्ष बांधणीपूर्वीच्या प्रमाणात कमकुवत झाल्याने तसेच पक्षाचा वसई तालुक्यातील बविआचा प्रभाव कमी झाल्याने त्यांची बोईसरमध्ये पिछेहाट झाली.

विक्रमगड येथे महाविकास आघाडी व महायुगीमध्ये अतितटीची लढत अपेक्षित असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिजाऊ संघटनेच्या मदतीने केलेली बंडखोरी महत्त्वपूर्ण ठरली. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपासाठी काम केल्याचे सांगितले जात असून मत विभागणीमुळे भाजपाला सहजपणे विजय संपादन करता आला.

वसई प्रमाणेच डहाणू मतदारसंघात देखील चुरशीची लढत शेवटच्या फेरीपर्यंत सुरू राहील. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावक्षेत्रात त्यांचा उमेदवार पिछाडीवर पडला होता. पक्षाचा जुना कार्यकर्ता असणाऱ्या नवीन चेहरा उमेदवार म्हणून देताना पक्षांमध्ये झालेल्या नाराजी नाट्यामुळे भाजपाचे प्राबल्य असणाऱ्या डहाणू तालुक्यात भाजपाला उमेदवाराला फटका बसला. तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारासाठी त्यांच्या ताब्यात असणाऱ्या जिल्हा परिषद गटाच्या भागात मुसंडी मारल्याने विनोद निकोले यांना आमदारकी राखता आली.

हेही वाचा – वर्धा : पोरक्या काँग्रेसला उमेद देण्याचे काँग्रेस नेत्यांपुढे आव्हान

वसई व नालासोपारा मतदार संघामध्ये पक्षांमधील अंतर्गत धुसफूस, बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांकडून अपेक्षित योगदान न मिळाल्याने तसेच दोन्ही मतदारसंघात वाढणाऱ्या मतदारांच्या संख्येकडे दुर्लक्ष झाल्याने बहुजन विकास आघाडीचा पराभव झाला. वसई तालुक्यात उत्तर भारतीय मतांचे झालेले ध्रुवीकरण व भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांच्या सोबत झालेल्या प्रकाराचा उलट प्रभाव मतदारांवर झाल्यामुळे बहुजन विकास आघाडीला दोन्ही जागा गमवाव्या लागल्या.

इतरही कारणे …

या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, जयंत पाटील, योगेंद्र यादव यांच्या सभा जिल्ह्यात झाल्या. या सभांना गर्दी झाली होती. तरी देखील डहाणूमध्ये भाजपासाठी, बोईसर येथे पालघर व बोईसर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांसाठी तर विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षासाठी लाभदायी ठरल्या नाहीत असे दिसून आले.

भाजपाने विवेक पंडित यांची कन्या स्नेहा दुबे-पंडित यांना उमेदवारी दिल्याने श्रमजीवी संघटनेच्या ताकतीच्या महायुतीला लाभ झाला तर जिजाऊ संघटनेने अखेरच्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांना साथ दिल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. मनसे व इतर अपक्ष उमेदवारांच्या मत विभागणीचा लाभ महायुतीच्या उमेदवारांना कमी अधिक प्रमाणात झाल्याचे देखील दिसून आले.

मताधिक्य व मतदार वाढ

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला या सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये १,८३,३०६ इतके मताधिक्य मिळाले होते. या विधानसभा निवडणुकीत या सहाही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना एकूण १,६१,५३३ इतके मताधिक्य प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या दोन निवडणुकीच्या दरम्यान पालघर लोकसभा क्षेत्रात १,४३,५५२ इतके मतदार वाढले असून वाढलेल्या मतदारांचा मताधिक्याशी संबंध असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

महायुतीची कामगिरी सुधारली

लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांना ६०१२४४ मत मिळाली होती. विधानसभेच्या सहा जागांसाठी महायुतीच्या उमेदवारांना एकत्रितपणे ९४,५१६ अधिक मत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीने देखील विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ३२,१६९ अधिक मत घेतली आहेत. मात्र महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या ४,१७९३८ या मतांपेक्षा ३८,३२३ मते कमी मिळवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत बंडखोर व अपक्षाने लोकसभेच्या तुलनेत ६६ हजार अधिक मते घेतली असून नोटा मतांमध्ये फक्त ५० मतांची वाढ झाली आहे.