अकोला : अकोला, वाशीम जिल्ह्यातील विधानसभेच्या आठही मतदारसंघांमध्ये यावेळेस तिरंगी व चौरंगी लढतीचे चित्र आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुती, मविआ व वंचित आघाडी यांच्यात तिरंगी सामना होईल. काही मतदारसंघात प्रभावशील नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने त्या ठिकाणी चौरंगी लढतीचे संकेत आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर मतदारसंघांमधील राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.

आठही मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका महायुती व मविआला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंड शमवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत. अकोला व वाशीम जिल्हा हे वंचित बहुजन आघाडीचे प्रभाव क्षेत्र. त्यामुळे या भागात बहुतांश ठिकाणी तिरंगी लढत होत असल्याचे दिसून येते. अकोला पूर्व मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर, शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर व वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांच्यात तिरंगी सामना होईल. अकोला पूर्वमध्ये जातीय राजकारण निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी महायुती व मविआमध्ये बंडखोरी झाली. नाराज इच्छुकांनी बंडखोरी करताना इतर पक्षांचा झेंडा हातात घेतला, तर काही अपक्ष म्हणून देखील रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण, वंचित चे डॉ. झिशान हुसेन, अपक्ष हरीश अलिमचंदानी, प्रहारचे डॉ.अशोक ओळंबे यांच्यात पंचरंगी लढतीची शक्यता आहे.

eknath shinde attack uddhav thackeray
आपटीबार : हल्ला पुरे!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
Rebellion to Mahayuti and Mahavikas Aghadi in Purandar
पुरंदरमध्ये महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण
n Kolhapur Mahayuti Insurgency in MVA kolhapur news
कोल्हापुरात ‘महायुती’ – ‘मविआ’त बंडखोरीची लागण
Sanjay Raut and Nana Patole
Mahavikas Aghadi : नाना पटोले अन् संजय राऊतांमधील वाद मिटला? बैठकीनंतर एकत्र येत भाजपावर केला गंभीर आरोप; म्हणाले, ‘मोठं षडयंत्र…’
aheri vidhan sabha
‘अहेरी’च्या जागेवरून युती-आघाडीत पेच? आत्राम राजघराण्यात टोकाचा राजकीय संघर्ष
bhandara vidhan sabha election 2024
भंडारा विधानसभेत चौरंगी लढत?

मूर्तिजापूर मतदारसंघात नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या टप्प्यात भाजपने विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे व वंचित आघाडीचे डॉ. सुगत वाघमारे यांच्यात सामना रंगण्याचा अंदाज आहे. अकोट मतदारसंघामध्ये भाजपचे प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे महेश गणगणे व वंचित आघाडीचे दीपक बोडके यांच्यात लढत होईल. बाळापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार नितीन देशमुख, वंचित आघाडीचे नातिकोद्दीन खतीब व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्यात तुल्यबळ लढत होण्याचा अंदाज आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यांची उमेदवारी कायम राहिल्यास चौरंगी लढत देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा >>> Latur Assembly Constituency : लातूरमधील लिंगायत मतपेढीचा कल कोणाकडे ?

वाशीम जिल्ह्यात रिसाेड मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी मंत्री अनंतराव देशमुख गेल्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अमित झनक, शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी व अपक्ष अनंतराव देशमुख यांच्यात सामना रंगेल. अनंतराव देशमुखांची उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांची मनधरणी केली जात आहे. कारंजा मतदारसंघात सर्वाधिक अपक्ष उमेदवार आहेत. महायुती व मविआतील अनेक घटक पक्षांतील इच्छुकांनी अर्ज दाखल केले. मतविभाजन टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारंजामध्ये भाजपच्या सई डहाके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्ञायक पाटणी, वंचितचे सुनील धाबेकर आणि एमआयएमकडून युसुफ पुंजानी यांच्यात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. वाशीम मतदारसंघात भाजपचे श्याम खोडे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्यात थेट सामना होण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी अपक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. आठही मतदारसंघात अत्यंत चुरस पाहायला मिळेल.

हेही वाचा >>> Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार

ऐन दिवाळीत मनधरणीची कसरत ऐन दिवाळीच्या काळात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उदंड बंडखोरी झाल्याने आता बंडोबांची मनधरणी करण्यावर उमेदवारांसह पक्ष नेतृत्वाचा भर दिसून येतो. ४ नोव्हेंबरपूर्वी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांकडून नाराजांची समजूत काढली जात आहे.