सांगली : सांगली मतदारसंघामध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या बंडाळीमुळे होत असलेली तिरंगी लढत अंतिम टप्प्यात चुरशीची आणि रंगतदार बनली आहे. दादा घराण्याची प्रतिष्ठा म्हणून आजी, माजी खासदार या निवडणुकीत जयश्री पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले असले तरी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात अद्याप यश आले नसल्याने बंडाळीने निर्धास्त झालेली भाजपही सावध झाली आहे.

एका बाजूला पै-पाहुणे आणि एका बाजूला पक्षनिष्ठा यामुळे माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचीही कसोटी लागणारी ही निवडणूक आहे. भाजपने या वेळी नको म्हणत असतानाही सुधीर गाडगीळ यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे. पक्षातून उमेदवारीसाठी अन्य नेते इच्छुक असताना त्यांना डावलून पक्ष कोणताच धोका घ्यायच्या तयारीत नव्हता. यामुळे अखेरच्या क्षणी त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पक्षाने बांधली. गेली दहा वर्षे ते सांगलीचे विधिमंडळात नेतृत्व करत आहेत. गेल्या वेळी पराभव होता होता वाचला असल्याने आणि लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा अपक्ष उमेदवाराला १९ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने या वेळी भाजपला अधिक प्रयत्नांबरोबरच विरोधकामध्ये मतविभागणीसाठी प्रयत्न करावे लागणार होते हे स्पष्ट आहे. काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या दृष्टीने सांगलीत काँग्रेसअंतर्गत झालेली बंडखोरी पथ्यावर पडते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात चार हजार कोटींचा निधी सांगलीसाठी मंजूर केला असल्याचा दावा आमदार गाडगीळ यांनी केला असला तरी तो निधी पूल वगळता अन्यत्र का दिसत नाही हाही प्रश्नच आहे.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा :लक्षवेधी लढत : आघाडीतील लाथाळ्यांचा भाजपला फायदा?

निर्णायक मुद्दे

सांगली जिल्ह्यात चार दशकांपासून चर्चेत असलेला दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न या वेळीही होताच, पण याचबरोबर सांगलीसाठी विमानतळ, ड्रायपोर्ट हे विषयही या वेळी प्रचारात प्रामुख्याने पुढे आले. सांगलीचा एकेकाळी राज्याच्या राजकारणात असलेला दबदबा कमी झाल्याचे दिसून आले.

● विकासकामाकडे झालेले दुर्लक्ष, औद्याोगिक क्षेत्रात नवे प्रकल्प नाहीत. याचा परिणाम म्हणून तरुणाईचे पुणे, बंगळूरु शहराकडे होत असलेले स्थलांतर या मुद्द्यावर या निवडणुकीत चर्चा ज्या ताकदीने व्हायला हवी होती, तशी कोणत्याच पक्षाकडून झाली नाही.

हेही वाचा :लक्षवेधी लढत : ‘मैत्रीपूर्ण’ लढतीत फायदा कोणाला?

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती : ८५,९९३ ● अपक्ष (विशाल पाटील) : १,०५,१८५

Story img Loader