परभणी : विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असली तरी जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघातील लढतींबाबत अद्यापही मोठी संदिग्धता आहे. त्या त्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या विरोधात कोण लढणार याबाबत अद्यापही निश्चितता नाही तर प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूंनी अनेकांनी दावे केले आहेत.

एकदाची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रत्येक मतदारसंघात असलेल्या इच्छुकांनी आपल्या हालचाली वाढवल्या आहेत अशा स्थितीत प्रत्येक मतदारसंघातल्या विद्यमान आमदारांसोबत लढत कोणाची याबाबत आजही अनिश्चितता आहे. परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राहुल पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. या मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढवणार की भारतीय जनता पक्ष मैदानात उतरणार हे अजूनही स्पष्ट झाले नाही. या दोन्ही पक्षांच्या वतीने उमेदवारी मिळण्यासंदर्भात दावे प्रति दावे केले जात आहेत. अलीकडेच भारतीय जनता पक्षाच्या एका बैठकीत पाथरीची जागा शिंदे सेनेने लढावी आणि परभणीची जागा भाजपला सोडावी अशी मागणी करण्यात आली. अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विरोधात परभणीत महायुतीचा उमेदवार कोणत्या घटक पक्षाचा असेल याबाबत निश्चितता नाही.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’

हेही वाचा >>> बीआरएसपी विधानसभेच्या मैदानात, दीडशे जागांवर चाचपणी

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत. या मतदारसंघात तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी मोठी संदिग्धता आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आमदार गुट्टे यांच्या विरोधात आहेत. महायुतीने त्यांना उमेदवारी देऊ नये असा आग्रह या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नेतृत्वाकडे धरलेला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सिताराम घनदाट तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विशाल कदम हे दोघे दावेदार मानले जातात. या मतदारसंघातल्या उमेदवारीबाबत खासदार संजय जाधव यांची भूमिका निर्णायक असणार आहे. श्री. जाधव हे आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

हेही वाचा >>> लोकसभेतील पराभूत डॉ. हिना गावित यांची अक्कलकुवा मतदारसंघात तयारी

पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर हे आमदार आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाबाजानी दुर्राणी हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. अर्थात या जागेवर काँग्रेसचे विद्यमान आमदार असताना असा दावा कितपत टिकेल याविषयी प्रश्नचिन्ह आहे. महायुतीत मात्र पाथरीच्या जागेवरून एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. अलीकडेच एकनाथ शिंदे शिवसेनेने मोठा मेळावा घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे सूचित केले तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे समर्थक आमदार राजेश विटेकर यांनी पाथरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पाथरीतील लढतीबाबतही तुर्त स्पष्टता नाही. जिंतूर विधानसभा मतदारसंघात आमदार मेघना बोर्डीकर या भाजपच्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे हे सातत्याने मोर्चेबांधणी करत आहेत. खुद्द भांबळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी असताना याच ठिकाणी काँग्रेसचे श्री. सुरेश नागरे यांनीही गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी चालवली आहे. ‘आमचं ठरलंय’ असे त्यांचे फलक जिंतूर तालुक्याच्या ग्रामीण भागात लागलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या विरोधात जिंतूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष लढणार की काँग्रेस हा तिढा अजून सुटलेला नाही. विशेष म्हणजे महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघात बंडखोरी होऊन तिरंगी लढत अटळ असल्याचे संकेत आहेत. एकूणच विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अद्याप जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघात लढतींबबत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात मोठी संदिग्धता आहे.

Story img Loader