यवतमाळ : वणी येथे भाजप प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान दोन कार्यकर्त्यांच्या वादाने जातीय स्वरूप घेतले. भाजपच्या कार्यकर्त्यावर त्याने कुणबी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप होत आहे. त्यातच सोमवारी येथे प्रचारासाठी आलेले शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांची बॅग तपासण्यात आल्याने ही दोन्ही प्रकरणे येथे भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

कधी काळी काँग्रेसचा गड असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात २०१४ पासून भाजपची सत्ता आहे. दोन वेळा काँग्रेसचा पराभव करून भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे विधानसभेत पोहोचले. मात्र यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मुख्य लढतीत मनसे, अपक्ष, वंचित या घटाकंमुळे बरीच समीकरणे बदलणार आहेत. वणीची लढत बहुरंगी होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना कुणबी वक्तव्याच्या कथित प्रकरणात ‘डॅमेज कंट्रोल’ करताना बरीच कसरत करावी लागत आहे. हे प्रकरण थंडबस्त्यात पडण्याची चिन्हे असताना सोमवारी निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने वणीत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आलेले शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्या. हेलिपॅडवर घडलेल्या या प्रकाराने उद्धव ठाकरे उद्विग्न झाले. त्यांनी बॅगच नव्हे तर ‘युरीन पॉट’ही तपासा, अशा संतप्त सूचना या कर्मचाऱ्यांना केल्या होत्या. शिवाय स्वत: तपासणी पथकाची झाडाझडती घेत या प्रकाराचे छायाचित्रण करून ते समाज माध्यमांवर प्रसारित केले. सर्वत्र त्याचे तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी नेते, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या बॅगा तपासण्याची हिम्मत निवडणूक विभागने दाखवावी, असे आव्हानच ठाकरे यांनी वणी आणि दारव्हा येथील सभेत दिले. कालपासून समाज माध्यमांवर उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या या व्हिडीओला लाखो लोकांनी बघितले व प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची
Chhatrapati Sambhajinagar Jayadutt Kshirsagar withdrew candidacy resolving controversy around him
जयदत्त क्षीरसागरांच्या भूमिकेतले मळभ दूर; एका पुतण्याला बळ, दुसऱ्याला कळ
Phulumbri Assembly Constituency Assembly Election 2024 Challenge to BJP in Haribhau Bagde constituency
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

हे ही वाचा… मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे

निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले तरी वणीत हेलिकॉप्टरमधून उतरताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून ही अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. वणीत घडलेल्या या प्रकाराने भाजपने ‘हात दाखवून अवलक्षण’ केल्याची प्रतिक्रिया जनतेमधून उमटत आहे. वणीत कुणबी वक्तव्यामुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या भाजपला उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी प्रकरणामुळे निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराने आव्हान निर्माण केले. त्यांना शिवसेना उबाठातून निष्कासित केलेले जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांनी मदत केल्याने देरकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. मात्र कुणबी समाजाबद्दलचे कथित वक्तव्य आणि उद्धव ठाकरे यांचे बॅग तपासणी प्रकरण महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वणीत हेलिपॅडवर घडलेले प्रकरण उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने हाताळले व त्यांनतरच्या सभेत, समाज माध्यमांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर या प्रकाराबद्दल ज्या पद्धतीने ते व त्यांचा पक्ष, पदाधिकारी व्यक्त झाले त्यामुळे जनमानसात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाल्याची भावना आहे.