विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात काट्याची लढत आहे. महायुती व मविआला बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याने वाशीम, रिसोड व कारंजा मतदारसंघात तिरंगी-चौरंगी सामने होणार आहेत. जातीय समीकरण व मतविभाजनाचे गणित कुणाच्या पथ्यावर पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचाराचा ज्वर चढला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वाशीम मतदारसंघात यावेळेस भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना आहे. भाजपने भाकरी फिरवत चार वेळा आमदार राहिलेल्या लखन मलिक यांची उमेदवारी कापली. श्याम खोडे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला. त्यामुळे या जागेवर वरिष्ठांचे लक्ष राहणार आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी कार्यकारिणीत देखील बदल केला. त्याचा परिणाम जातीय समीकरणासह निवडणुकीवर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या तिकीटावर दुसऱ्या क्रमांकाची ५२ हजार ४६४ मते घेणारे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी हातात मशाल घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून ते रिंगणात आहेत. गेल्या वेळेस अपक्ष लढून ४५ हजार ४०७ मते घेणारे शशिकांत पेंढारकर पुन्हा एकदा अपक्षच निवडणूक रिंगणात आहेत. वाशीममध्ये मविआ व महायुतीमध्ये बंडखोरी झाली. त्यामुळे मतविभाजन होईल. वाशीममध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Pathri Constituency, Suresh Warpudkar,
बंडखोरीवरून वरपूडकर- बाबाजानी यांच्यात कलगीतुरा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Dombivli, Dombivli Ravindra Chavan, Raju Patil,
डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, राजू पाटील एकीने शिंदे यांच्या गोटात चुळबूळ
Jitendra Awhad On Vidhan Sabha Election 2024
Jitendra Awhad : मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

रिसाेड मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहे. माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत काँग्रेसचे अमित झनक यांना कडवी झुंज दिली होती. झनक यांनी दोन हजार १४१ मतांनी देशमुखांचा पराभव केला होता. त्यानंतर रिसोडमधून उमेदवारी मिळण्याच्या आशेवर अनंतराव देशमुख पुत्रांसह भाजपवासी झाले. मात्र, हा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सुटला. त्यामुळे अनंतराव देशमुखांनी बंडखोरी केली. गेल्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत. काँग्रेसचे अमित झनक सलग चौथ्यांदा रिंगणात असून शिवसेना शिंदे गटाने विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांना संधी दिली. रिसोडमध्ये अमित झनक, अनंतराव देशमुख व भावना गवळी यांच्यात तिरंगी सामना होईल. याठिकाणी जातीय समीकरण महत्त्वपूर्ण ठरेल.

हे ही वाचा… लोकसभेतील मताधिक्य कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान, भाजपला चिंता

कारंजा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीमध्ये तडजोड करून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सई डहाके यांनी पक्षांतर करून भाजपची उमेदवारी मिळवली, तर भाजपकडून इच्छुक असलेले दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी राष्ट्रवादीची तुतारी हातात घेऊन रिंगणात उतरले. वंचित आघाडीने देखील ऐनवेळी उमेदवार बदलून माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र सुनील धाबेकर यांना संधी दिली. युसुफ पुंजानी एमआयएमवर, तर नाईक परिवारातील ययाती नाईक देखील कारंजातून निवडणूक लढत आहेत. कारंजामध्ये चौरंगी लढतीचा अंदाज आहे.

हे ही वाचा… भाजपपुढे लोकसभेतील पिछाडी दूर करण्याचे आव्हान, गडचिरोलीत उमेदवार बदलला, आरमोरीत अडचण

कोणत्या घराण्याला मतदारांची साथ?

वाशीम जिल्ह्यात गवळी, झनक व देशमुख घराण्याचे मोठे प्रस्थ आहे. या तिन्ही परिवारातून रिसोड मतदारसंघात उमेदवार उभे आहेत. कारंजातून देखील दिवंगत राष्ट्रवादीचे नेते प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके, दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी, धाबेकर कुटुंबातील सुनील धाबेकर व नाईक घराण्यातील ययाती नाईक हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. मतदार कोणत्या घराण्याला साथ देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader