Rahul Gandhi Election Campaign in Gondia Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी गोंदिया जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. सध्या जिल्ह्यात महाविकास आघाडीत झालेली बंडखोरी, नवखे व बाहेरील उमेदवाराला दिलेली संधी, त्यातच पक्षाअंतर्गत असलेली नाराजी, आदींचा विचार केल्यास राहुल गांधींची ही सभा मविआच्या उमेदवारांना तारणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा-गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व देवरी-आमगाव असे चार मतदारसंघ येतात. या मतदरासंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र, काही बंडखोर, अपक्ष उमेदवारांसह वंचित, बसप, आदी छोट्या पक्षांचा जोरही दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune voters supported BJP in elections but BJP ignored and cheated punekars Former Congress mla mohan Joshis allegation
भाजपने पुणेकरांची फसवणूक केली? काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप
Congress to help Aam Aadmi Party against BJP in final phase
अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या मदतीला काँग्रेस?
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Delhi Poll
Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत रंगणार आप विरुद्ध भाजपा सामना, ‘या’ ९ मतदारसंघात होणार चुरशीची लढत
bjp delhi marathi news
दिल्लीसाठी भाजप सज्ज; महाराष्ट्र, हरियाणाच्या धर्तीवर सूक्ष्म नियोजनावर भर

अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठी बंडखोरी झाली आहे. येथे काँग्रेसतर्फे दिलीप बनसोड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘पार्सल’ उमेदवार दिल्याचा ठपका ठेवत अजय लांजेवार यांनी बंड पुकारले आणि निवडणूक रिंगणात उडी घेतली. याचबरोबर विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे चिरंजीव सुगत चंद्रिकापुरेही प्रहारकडून आपले भाग्य आजमावत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर तगडे बंडखोर असल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे.

देवरी-आमगाव मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार सहेसराम कोरोटे यांना डावलून राजकारणात नवखे असलेले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही नाराजी खदखदत असल्याचे जाणवते.

तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला गेली. येथे रविकांत बोपचे उमेदवार आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी दिसून आली. नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी नाराजी पूर्णपणे दूर झाली, असे जाणवत नाही.

हे ही वाचा… Akola West Assembly Constituency : ‘अकोला पश्चिम’मध्ये धार्मिक राजकारणाचा ज्वर चढला

गोंदिया मतदारसंघात काँग्रेसकडून गोपालदास अग्रवाल रिंगणात आहेत. मागील निवडणुकीच्या तोंडावर अग्रवाल यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती. त्यावेळी अग्रवाल यांचा पराभव झाला. या निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा स्वगृही (काँग्रेस) परतले. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. यामुळे काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्वीकारले असेलच, असे म्हणता येणार नाही.

एकंदरीत, संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीपुढे अनेक अडथळे दिसून येत आहे. या अडथळ्यांवर मात करीत विजयश्री खेचून आणण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या उमेदवारांपुढे आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तारणार का, असा प्रश्न चर्चेत आला आहे.

Story img Loader