गडचिरोली : दरवेळी सर्वाधिक मतदानामुळे अव्वलस्थान पटकावणाऱ्या गडचिरोलीत यंदाही विक्रमी मतदान झाले. यात महिला आणि नवमतदारांच्या वाढलेल्या मतटक्क्यामुळे अंतिम कौल कुणाच्या बाजूने जाणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली आणि आरमोरी येथे सरासरी ७५.२६ टक्के मतदान झाले आहे.

यंदा राज्यात सर्वत्र मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे मतदारांचा सूर विरोधात आहे की बाजूने याबद्दल सत्ताधाऱ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत मतदानाचा टक्का मागील वेळेपेक्षा पाच टक्क्यांनी वाढला आहे. यात गडचिरोली ७४.९२, अहेरी ७३.८९ आणि आरमोरीत सर्वाधिक ७६.९७ इतके मतदान झाले. जिल्ह्यात एकूण सरासरी ७५.२६ टक्के मतदान झाले. यंदा महिला आणि नवमतदरांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निर्णयात त्यांचा कौल महत्त्वाचा ठरणार, असे जाणकार सांगतात. दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी उत्स्फूर्त मतदान केल्याची चर्चा आहे.

Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Dalit, Muslim, Chandrapur district, Chandrapur district voting, Chandrapur news, Chandrapur district news, loksatta news,
चंद्रपूर जिल्ह्यात दलित, मुस्लीम समाजाचे भरघोस मतदान; वाढीव मतदान कोणासाठी लाभदायी?
viral video of andhra pradesh
Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
mahavikas aghadi
‘संविधान बचाव’ आणि ‘गद्दारी’ कालबाह्य?
Mahavikas Aghadi :
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा – मतदानाचे मुद्दे : मराठवाडा; मुद्दे हेच, प्राधान्यक्रम वेगवेगळे!

मुलगी विरुद्ध वडील सामन्यामुळे राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहेरी विधानसभेत यंदा तिरंगी लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लढत असलेल्या भाग्यश्री आत्राम, अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम, अपक्ष अम्ब्रीशराव आत्राम आणि हणमंतू मडावी यांच्यामध्ये चुरस आहे. काँग्रेस व भाजपच्या बंडखोर उमेदवारामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो. त्यामुळे मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आरमोरीत भाजपचे कृष्णा गजबे विरुद्ध काँग्रेसचे रामदास मसराम अशी थेट लढत झाली. याठिकाणी काँग्रेसचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. तर गडचिरोलीत काँग्रेसचे मनोहर पोरेटी विरुद्ध भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे अशी लढत झाली. यंदा दोन्ही पक्षांनी याठिकाणी नवीन उमेदवार दिले. त्यामुळे येथेही चुरस पहायला मिळत आहे. येत्या २३ नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होणार असले तरी मतदानानंतरच विजयी कोण होणार याबद्दल राजकीय पक्षाकडून दावे केले जात आहे.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात दलित, मुस्लीम समाजाचे भरघोस मतदान; वाढीव मतदान कोणासाठी लाभदायी?

लाडकी बहीण महायुतीला तारणार?

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर कधी नव्हे ते महिलांची संख्या लक्षणीय होती. यामागे लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला असता महिलांमध्ये तशी चर्चा देखील होती. त्यामुळे याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो.