Amit Thackeray Mahim Assembly Constituency: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वपक्षाचा एकही उमेदवार उभा न करता महायुतीला ‘बिनशर्त पाठिंबा’ देऊ केला होता. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी ठाणे, कोकण, पुणे आणि दादर येथे प्रचार सभा घेतली होती. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीचा भाग असतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र ‘ना आघाडी, ना युती, मनसे स्वबळावर निवडणुका लढविणार’, असे जाहीर करत राज ठाकरेंनी १३ ऑक्टोबर (दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी) रोजी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा मानस जाहीर केला. विशेष म्हणजे युती आणि आघाडीचे जागावाटप रखडलेले असताना राज ठाकरे यांनी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत त्यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांना मुंबईच्या माहीम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. ३२ वर्षीय अमित ठाकरे यांची पहिलीच निवडणूक आहे. याच मतदारसंघात शिवसेना भवन असून गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा हा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ प्रमाणेच यावेळीही मनसे हा किल्ला काबीज करणार का? हे २३ नोव्हेंबर रोजी कळू शकेल.

दरम्यान, राज ठाकरे मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून नेमके काय साधू इच्छितात? माहीम हाच मतदारसंघ त्यांनी का निवडला? आणि कधीही निवडणुकीत न उतरणारे ठाकरे कुटुंबीय आपल्या पुढच्या पिढ्यांना विधानसभेत का पाठवू इच्छित आहेत? याबाबतचा आढावा द इंडियन एक्स्प्रेसच्या लेखात घेण्यात आला आहे.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sanjay Raut slams Raj Thackeray (1)
Sanjay Raut: ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
devendra fadnavis marathi news
“महाराष्ट्रात आम्ही अतिआत्मविश्वासात होतो”, देवेंद्र फडणवीसांनी केलं मान्य; ‘या’ दोन कारणांचा केला उल्लेख!
mahayuti seat distribution Diwali
जागावाटप दिवाळीनंतरच?
History of ikat
History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा?
Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत

माहीम विधानसभा मतदारसंघावर कुणाचे वर्चस्व?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ज्या काही मतदारसंघात आजही मोठा प्रभाव आहे, त्यात माहीम मतदारसंघाचा आवर्जून उल्लेख होतो. २०१९ च्या निवडणुकीत संयुक्त शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी युतीमधून लढून मनसेच्या संदीप देशपांडेंचा पराभव केला होता. सदा सरवणकर यांना ६१,३३७ मते मिळाली होती, तर संदीप देशपांडे ४२,६९० मते घेऊन दुसऱ्या स्थानावर राहिले. त्याआधी २०१४ च्या निवडणुकीत सदा सरवणकर यांनी मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा पराभव केला होता; तर २००९ मध्ये मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी माहीममध्ये विजय मिळवला होता.

हे वाचा >> Sanjay Raut: अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत यांचे सूचक विधान; म्हणाले, “तो आमच्या…”

u

महाविकास आघाडीचे आमदार असलेल्या मतदारसंघातील उमेदवार राज ठाकरेंनी पहिल्या यादीतून जाहीर केलेले दिसतात. या यादीवरून मनसेची महायुतीशी मागच्या दाराने हातमिळवणी असल्याचे सांगितले जाते. मनसे पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी मनसेची पुरेशी ताकद आहे, तिथेच उमेदवार जाहीर करण्यावर भर देण्यात आला आहे. यापैकी प्रभावी उमेदवार निवडून येण्याची शक्यता मनसेच्या नेत्यांना वाटते. ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही, तिथे मतांचे विभाजन होऊन महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष करून शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या पक्षाला धक्का बसू शकतो.

अमित ठाकरेंना विधानसभेत उतरवून मनसे काय साध्य करणार?

राजकीय विश्लेषकांच्या मते ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण पक्षासाठी दोन कारणांनी महत्त्वाची मानली जाते. एक म्हणजे, या निवडणुकीच्या माध्यमातून मनसे तरुण नेत्यांना पुढे आणत आहे, ज्यात ‘राज’पुत्र अमित ठाकरेंचाही समावेश आहे. तर दुसरे म्हणजे, निवडणुकीच्या राजकारणात मनसे आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

महायुती आणि मविआमध्ये तीन-तीन प्रमुख पक्ष निवडणूक लढवित असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लहान लहान पक्षांना आपली छाप पाडणे कठीण होणार असल्याचे म्हटले जाते.

भाजपामधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मागच्या एक वर्षांपासून मनसेसह इतर अनेक पक्षांशी युती केल्यास त्याचे काय फायदे-तोटे होतील, याचा अभ्यास आम्ही करत होतो. पण, मनसेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही मतदारसंघात मनसे मराठी मतांचे विभाजन करू शकतो, ज्याचा फटका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला बसेल, त्यामुळे हा निर्णय आमच्या पथ्यावर पडू शकतो.

वरळीत मनसे वि. उबाठा सेना लढत

अमित ठाकरेंच्या माहीम विधानसभेच्या शेजारी असलेल्या वरळी विधानसभेत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे निवडणूक लढवित आहेत. ३४ वर्षीय आदित्य ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत ६७ हजार मते मिळविली होती. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढविणारे ते पहिलेच नेते ठरले होते. आदित्य ठाकरेंच्या विरोधात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश माने यांना उमेदवारी देऊ केली होती. मनसेने आदित्य ठाकरेंसाठी या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता. मात्र, यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

वरळीसह मनसेकडून पुण्यातील हडपसर, खडकवासला या मतदारसंघातून मविआला जोरदार टक्कर दिली जाऊ शकते. २००९ च्या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात मनसेचे रमेश वांजळे विजयी झाले होते. महायुतीच्या एका नेत्याने सांगितले की, शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या विरोधात मनसेला शिवेसना (एकनाथ शिंदे) आणि भाजपाचा छुपा पाठिंबा मिळू शकतो. मात्र, इतर अनेक ठिकाणी मनसेचा उमेदवार तिसऱ्या किंवा त्याखालील स्थानावर राहू शकतो.

हे वाचा >> Mahim Assembly constituency : माहीममध्ये यंदा तिरंगी लढत? सदा सरवणकरांचा मार्ग खडतर? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

२०१९ मध्ये मनसेची कामगिरी कशी होती?

२०१९ साली मनसेने १०१ उमेदवार उभे केले होते, पण कल्याण ग्रामीणमध्ये प्रमोद (राजू) पाटील वगळता इतर शंभर ठिकाणी मनसेला अपयश आले. तसेच राज्यात मनसेने २.२२ टक्के एवढीच मते घेतली. २००६ साली शिवसेनेपासून वेगळे होऊन राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत त्यांनी १३ विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला, मात्र त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी तर होत होती, मात्र मतदान मिळविण्यात ते अपयशी ठरत होते. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत केवळ एकच आमदार मनसेला निवडून आणता आला.