Amit Thackeray Mahim Assembly Constituency: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वपक्षाचा एकही उमेदवार उभा न करता महायुतीला ‘बिनशर्त पाठिंबा’ देऊ केला होता. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी ठाणे, कोकण, पुणे आणि दादर येथे प्रचार सभा घेतली होती. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीचा भाग असतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र ‘ना आघाडी, ना युती, मनसे स्वबळावर निवडणुका लढविणार’, असे जाहीर करत राज ठाकरेंनी १३ ऑक्टोबर (दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी) रोजी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा मानस जाहीर केला. विशेष म्हणजे युती आणि आघाडीचे जागावाटप रखडलेले असताना राज ठाकरे यांनी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत त्यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांना मुंबईच्या माहीम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. ३२ वर्षीय अमित ठाकरे यांची पहिलीच निवडणूक आहे. याच मतदारसंघात शिवसेना भवन असून गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा हा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ प्रमाणेच यावेळीही मनसे हा किल्ला काबीज करणार का? हे २३ नोव्हेंबर रोजी कळू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा