अमरावती : अमरावती ही सांस्‍कृतिक नगरी असली आणि येथे गाणे वाजविण्‍याच्‍या कार्यक्रमाला एकत्र येणारे राजकीय नेते परस्‍परांच्‍या गळ्यात गळे घालताना दिसत असले, तरी अमरावतीचा राजकीय पट अलीकडच्‍या काळात सूडनाट्याने रंगला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा सूड उगवण्‍यासाठी नवनीत राणा यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीच्‍या मैदानात विरोधकांना घेरले. बच्‍चू कडू, यशोमती ठाकूर या दिग्‍गजांना भाजपने धूळ चारली. परभवाचा वचपा काढल्‍याचा आनंद राणा समर्थकांना झाला असला, तरी हे सूडचक्र केव्‍हा थांबणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

२०१९ मध्‍ये काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आलेल्‍या नवनीत राणांनी भाजपला पाठिंबा दिल्‍याने पाच वर्षे त्‍यांचे काँग्रेससोबत खटके उडत होते. महाविकास आघाडीच्‍या सरकारमध्‍ये जिल्‍ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली. काँग्रेसच्‍या नेत्‍या यशोमती ठाकूर आणि प्रहार जनशक्‍ती पक्षाचे नेते बच्‍चू कडू यांची राजकीय पकड मजबूत होत असताना राणा समर्थक मात्र अस्‍वस्‍थ होते. नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांवर श‍ाब्दिक हल्‍ले सुरू केले. त्‍यातच त्‍यांनी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या मातोश्री या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट धरला. देशभर त्‍यांना लोकप्रियता मिळाली, पण कडवट हिंदुत्‍वाचा झेडा हाती घेतल्‍याने नवनीत राणा यांचा दलित, मुस्लिमांचा जनाधार निसटत गेला. राज्‍यात सत्‍तांतरादरम्‍यान झालेले खोक्‍यांचे आरोप, त्‍यात राणांनी बच्‍चू कडू यांना लक्ष्‍य केल्‍याने आगीत तेल ओतले गेले. बच्‍चू कडू हे महायुतीत असूनही विरोधात भूमिका घेत गेले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – रायगड जिल्ह्यात शेकापच्या जनाधाराला ओहोटी, पाटी कोरी

लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी नवनीत राणा यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आणि बच्‍चू कडूंना प्रत्‍युत्‍तर देण्‍याची संधी मिळाली. बच्‍चू कडूंनी नवनीत राणांच्‍या विरोधात प्रहार जनशक्‍ती पक्षाचा उमेदवार उभा केला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ हे आधीपासूनच विरोधात होते. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. राणा विरोधक एकत्र झाले. हिंदुत्‍वाचा झेंडा हाती घेऊनही नवनीत राणा यांना विजय मिळू शकला नाही. हा पराभव नवनीत राणा यांच्‍या चांगलाच जिव्‍हारी लागला होता.

हेही वाचा – दक्षिण नागपूरमध्ये ओबीसी मतांचे ध्रुवीकरण भाजपच्या पथ्यावर

आता विधानसभा निवडणुकीत राणा दाम्‍पत्‍याने अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात दर्यापुरात युवा स्‍वाभिमान पक्षाचा उमेदवार उभा केला. तेथे महायुतीला यश मिळू शकले नाही, पण अडसुळांना पराभूत केल्‍याचा आनंद राणा समर्थकांना आहे. २०१९ च्‍या निवडणुकीत बच्‍चू कडू हे ८ हजार ३९६ मतांनी निवडून आले होते, यावेळी भाजपने त्‍यांचा १२ हजार १३१ मतांनी पराभव केला. २०१९ मध्‍ये यशोमती ठाकूर या १० हजार ३६१ मतांनी विजयी झाल्‍या होत्‍या, यावेळी भाजपने त्‍यांचा ७ हजार ६१७ मतांनी पराभव केला. मेळघाटमध्‍ये राणांना विरोध करणारे प्रहारचे राजकुमार पटेल तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. विरोधकांचे राजकारण संपविल्‍याच्‍या राणा यांच्‍या मुद्रा समाजमाध्‍यमांवर झळकत असल्‍या, तरी ही नव्‍या सूडचक्राची सुरुवात ठरेल का, याची चर्चा आता रंगली आहे.

Story img Loader