नागपूर : भाजप-काँग्रेसने मध्य नागपुरातून हलबा समाजाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे दोन मतदारसंघात हलबा समाजाने उमेदवार उभे केले. याचा फटका बसू नये म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत हलबा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यावर समाजाने विश्वास दाखवल्याने हलबांचे मध्य नागपुरात मतविभाजन कमी करण्यात भाजपला यश आले.

मध्य नागपुरात हलबा समाजाची संख्या लक्षणीय आहे. हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे अनिस अहमद येथून सातत्याने निवडून येत होते. भाजपने येथून हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना उमेदवारी दिली. पहिली निवडणूक कुंभारे हरले. परंतु त्यानंतर सतत तीन वेळ कुंभारे येथून विजयी झाले. त्यामुळे हा मतदारसंघ आता भाजपचा गड झाला. यावेळी भाजपने विकास कुंभारे यांना उमेदवारी नाकारली. पण त्यांच्याऐवजी भाजपने हलबाच उमेदवार द्यावा, असा आग्रह समाजाने धरला होता तो भाजपने जाणीवपूर्वक मोडित काढत दटकेंच्या स्वरुपात गैरहलबा उमेदवार दिला. दुसरीकडे काँग्रेसनेही मागील निवडणुकीत अल्प मताने पराभूत झालेल्ा बंटी शेळके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षावर हलबा समाजाने नाराजी व्यक्त केली आणि समाजाची ताकद या दोन्ही पक्षांना दाखवण्यासाठी समाजाचे रमेश पुणेकर यांना रिगणात उतरवले. पुणेकर हलबांची मते घेतील, असे चित्र निर्माण करण्यात आले. त्याचा भाजपला फटका बसेल व येथून काँग्रेस जिकेल अशीही चर्चा करून भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे भाजपने या दबावाकडे दुर्लक्ष करीत दटकेच्या प्रचारावर अधिक भर दिला. त्यांच्यासाठी गडकरी, फडणवीस यांनी सभा घेतल्या. गडकरी यांनी तर जातपातीची राजकारण खपवून घेणार नाही, असे जाहीर भाषणातच सांगितले व हलबांवर अन्याय होऊ देणार नाही असेही आश्वस्थ केले होते. त्यामुळे रमेश पुणेकर यांना हलबा समाजाची अपेक्षित मते मिळाली नाही. ते २३ हजार मतांवर थांबले.

BJP benefits from governments decision workers will become SPOs
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा भाजपला फायदा, कार्यकर्ते होणार ‘एसपीओ’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

हेही वाचा…अकोला जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व, ‘अकोला पश्चिम’मध्ये बंडखोरीचा भाजपला मोठा फटका; दोन दशकानंतर जिल्ह्यात पंजाला संधी

हलबाबहुल भागात दटके आघाडीवर

मध्य नागपुरातील तांडापेठ, बर्से नगर, पाचपावली, नाईक तलाव परिसरातील अनेक भागात भाजपचे प्रवीण दटके यांनी अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांच्याहून अधिक मते घेतली. येथे रमेश पुणेकर दुसऱ्या क्रमांकावर तर बंटी शेळके तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यातून हलबांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे हे दिसून आले.

हेही वाचा…प्रस्थापितांची शेती पडीत ठेवून मतदारांनी कमळ शेती फुलविली, भाजपच्या पदरात भरभरून मतदान

महाल भागातही भाजपला मतदान वाढले

मध्य नागपुरातून हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना भाजपने चार वेळा उमेदवारी दिली. पहिल्यांचा त्यांचा पराभव झाला. त्यानंतर दोनदा निवडून आल्यावर २०१९ मध्ये त्यांन तिसऱ्यांचा उमेदवारी दिली गेली. याप्रसंगी महाल परिसरात विकास कुंभारेवर रोष होता. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची अनेक मते काँग्रेसच्या बंटी शेळके यांच्याकडे वगळी. परंतु यंदा महाल भागातून येणाऱ्या प्रवीण दटके यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपला सुमारे ५ ते सहा हजार मते महाल परिसरात अधिक मिळाली

Story img Loader