भंडारा : मागील २५ वर्षांपासून साकोली मतदारसंघावर घट्ट पकड असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा येथे झालेला ‘लाजिरवाणा विजय’ त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडणारा ठरला आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक वगळता कुठल्याही पक्षात असो वा स्वतंत्र लढलेले असो, पटोले कधीच हरले नाहीत. या निवडणुकीतही ते जिंकले, मात्र काठावर.

साकोली तालुक्यातील सुकळी या छोट्याशा गावातल्या नानांनी राजकारणात गल्ली ते दिल्ली, अशी उत्तुंग झेप घेतली. पटोलेंना त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून लढत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. मागील पाच निवडणुका ते या मतदारसंघातून लढले आणि जिंकलेसुद्धा.

Shambhuraj desai devendra fadnavis
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची माघार नाही? शंभूराज देसाई म्हणाले, “आम्ही फडणवीसांना सांगितलंय…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Yogi adityanath
UP Assembly Bypoll Election : तीन दशकांपासून हारत असलेल्या जागाही जिंकल्या, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही भाजपाची बाजी
Amol Mitkari ajit pawar naresh arora news
अजित पवारांचा ‘तो’ फोटो पाहून मिटकरींचा संताप, पक्षाने एकटं पाडलं; मिटकरी थेट भिडले; राष्ट्रवादीत चाललंय काय?
mahayuti vidhan sabha result
Who is New CM of Maharashtra Live: अजित पवारांमुळे शिवसेनेची (शिंदे) बार्गेनिंग पॉवर घटली, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप
Ram Satpute and Ranjeetsinha Mohite Patil: Malshiras Assembly Election.
Ram Satpute: “काल माझ्यासमोर त्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांना…”, माजी आमदार राम सातपुतेंचा मोठा दावा; रणजितसिंह मोहिते पाटलांवर गंभीर आरोप!
Eknath Shinde, Eknath Shinde withdrawal from the post of Chief Minister, Shivsena Activist, Eknath Shinde Resignation,
Eknath Shinde Resignation : मुख्यमंत्रीपदावरून शिंदे यांची माघार? शिवसेनेचा आक्रमकपणा मावळला

हेही वाचा – देवतळे कुटुंबाची धानोरकर कुटुंबावर मात; ७० वर्षांनंतर वरोऱ्यात कमळ फुलले

साकोली मतदारसंघ नानांची जन्मभूमीच नाही तर कर्मभूमी देखील आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असलेल्या नानांनी मागील २५ वर्षांत येथील शेतकऱ्यांसाठी काय केले, विकासाची कोणती कामे केलीत, बेरोजगारांसाठी काय केले, क्षेत्रात कोणते नवे उद्योग आणले, या सर्व प्रश्नांभोवती ही निवडणूक लढली गेली आणि त्याचीच परिणती निकालात झाली. प्रतिस्पर्धी उमेदवाराबाबत भाजपमध्ये असलेली नाराजी नानांच्या फायद्याची ठरेल, असे अंदाज वर्तवले जात होते. त्यामुळे नानाही गाफील राहिले. सुदैवाने भाजपची मते विभाजित झाली आणि टपाल मते देवदुतासमान धावून आलीत. नाना काठावर विजयी झालेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे नानांचा आत्मविश्वास बळावला. मात्र हाच आत्मविश्वास अतिआत्मविश्वासात परावर्तित झाला. नानांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. भंडारा विधानसभा मतदारसंघातही त्यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर धुरा सोपवली होती. यामुळे तेथेही नानांचा घात झाला. काँग्रेसच्याच काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तेथे महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांचा प्रचार केला. यामुळे नाना तोंडघशी पडले.

हेही वाचा – काँग्रेसच्या गडाला भाजपने सुरूंग कसा लावला?  

अवघ्या २०८ मतांनी विजयी झालेल्या नानांना आता आत्मचिंतनाची गरज असून ‘केवळ गोड बोलून आणि खांद्यावर हात ठेवून विजय संपादन करता येतो,’ या त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे.