चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या ७० वर्षांच्या इतिहासात वरोरा मतदारसंघात प्रथमच भाजपचे कमळ फुलले. येथे भाजपचे करण देवतळे यांनी धानोरकर कुटुंबातील अनिल धानोरकर व खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना पराभवाची धूळ चारत विजय संपादन केला आणि देवतळे कुटुंबाने धानोरकर कुटुंबावर मात केली.

वरोरा या कुणबीबहुल मतदारसंघात आजवर भाजपने कधीच विजय मिळविला नाही. या मतदारसंघावर करण देवतळे यांचे आजोबा दादासाहेब देवतळे यांचे वर्चस्व होते. त्यांनी काँग्रेसकडून येथे सलग निवडणुका जिंकल्या. मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पश्चात शेतकरी संघटनेचे ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी सलग दोन निवडणुका जिंकल्या. टेमुर्डे यांचा पराभव करण देवतळे यांचे वडील संजय देवतळे यांनी केला. त्यांनी काँग्रेसकडून सलग चार विधानसभा निवडणुका जिंकल्या. तेही मंत्री राहिलेत.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Ramdas Athawale, Panvel Candidate Prashant Thakur,
राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

हेही वाचा – भुजबळ यांना मराठा समाजाच्या नाराजीची बसली झळ

२०१४ मध्ये काँग्रेसने संजय देवतळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मात्र या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभाव झाल्यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी डॉ. आसावरी देवतळे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे दुखावलेल्या संजय देवतळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली. २०१४ च्या देवतळे विरुद्ध देवतळे लढतीत शिवसेनेचे दिवं. बाळू धानोरकर यांनी अवघ्या अडीच हजार मतांनी विजय मिळवला. कालांतराने बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांनी पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी विधानसभेची उमेदवारी आणली, तर संजय देवतळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रतिभा धानोरकर त्या लढतीत विजयी झाल्या होत्या.

हेही वाचा – काँग्रेसच्या गडाला भाजपने सुरूंग कसा लावला?  

बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढली आणि जिंकली. यामुळे आत्मविश्वास बळावलेल्या धानोरकर यांनी घरातच उमेदवारी द्यायची, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला. लाडका भाऊ प्रवीण काकडे यांची कुठलीही क्षमता नसताना त्यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली. यामुळे बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी बंडखोरी केली. भाजपचे करण देवतळे यांनी अनिल धानोरकर आणि प्रवीण काकडे यांचा पराभव करीत वरोरा मतदारसंघात पुन्हा देवतळे कुटुंबाचे वर्चस्व प्रस्थापित केले.