अलिबाग- विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर आली तरी रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवार कोण याबाबत स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे घटक पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. उरण, पेण आणि पनवेल मतदारसंघात शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि शेकाप दोन्ही पक्षांकडून आपलेच उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत असल्याचा दावा केला जात असल्याने, गोंधळाचे वातावरण आहे. महत्वाची बाब म्हणजे उरण मतदारसंघात शेकापच्या उमेदवाराकडून होणाऱ्या अपप्रचाराबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाने या संदर्भात मुख्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे शेकाप उमेदवार प्रितम म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रायगड जिल्ह्यात पनवेल, पेण आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण याची स्पष्टता झालेली नाही. तिन्ही मतदारसंघात शेकाप आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून आपण महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे. प्रचारात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या फोटोंचा वापर केला जात आहे. त्यामुळे मतदार आणि राजकीय पक्षही चक्रावले आहेत.

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Winter Session Nagpur Maharashtra Assembly Opposition Leader Mahavikas Aghadi
बंगला सज्ज,विरोधी पक्ष नेत्याबाबत अनिश्चितता
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…

हेही वाचा >>>वंचितच्या भूमिकेमुळे ‘अकोला पश्चिम’चे समीकरण बदलणार

शिवेसना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उरणमधून मनोहरशेठ भोईर, पनवेल मधून लिना गरड, तर पेण मधून प्रसाद भोईर निवडणूक लढवत आहेत. तर शेकापने उरण मधून प्रितम म्हात्रे, पेण मधून अतुल म्हात्रे तर पनवेल मधून बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरून प्रचारही करत आहेत. उरणमध्ये शेकाप उमेदवाराकडून होणाऱ्या अपप्रचाराबाबत शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला आहे.

हेही वाचा >>>महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे

उरण मध्ये प्रतिम म्हात्रे यांच्याकडून प्रचारात महाविकास आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो प्रचारात वापरले जात आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. केंद्रीय निवडणूक आचार संहितेच्या परिशिष्ट १ भाग ७ मधील आदेश क्रमांक (पाच) मधील तरतुदीनुसार मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केल्या प्रकरणी प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्यावर करवाई करण्याचे निर्देश द्यावेत असे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सचिन पारसनाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे. पनवेल आणि पेण मध्येही महायुतीचे अधिकृत उमेदवार कोण याबाबत अशीच गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार कोण हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

Story img Loader