कल्याण : भाजपने महायुतीच्या उमेदवार म्हणून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याचा निर्णय सोमवारी कल्याण पूर्व शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील एका बैठकीत घेतला.

हेही वाचा >>> शिंदे गटाचा विरोध डावलून भाजपचे तिकीटवाटप; गायकवाड, केळकर, नाईक, कथोरे यांच्या नावांची घोषणा

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी

सुलभा गायकवाड यांची उमेदवारी म्हणजे आमच्यासाठी काळा दिवस आहे, अशा भावना शिवसेनेच्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या. माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे समर्थक शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून कल्याण पूर्वेत भाजप-शिवसेनेतील दरी रुंदावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी ही दरी काही प्रमाणात बुजविण्याचा प्रयत्न केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ही दरी पुन्हा रुंदीवली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अन्यथा एकही शिवसैनिक महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. महिला, पुरुष कार्यकर्ते अधिक संख्येने यावेळी उपस्थित होते. ज्या व्यक्तीने कल्याण पूर्वेचा पंधरा वर्षांत विकास केला नाही, त्याच व्यक्तीच्या घरात पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने काय साध्य केले आहे, असे प्रश्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केले. या मतदारसंघात उमेदवार बदलला नाहीतर बंडखोर उमेदवार उभा केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.