नाशिक – शहरातील विधानसभेच्या तीनपैकी दोन जागांसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस हे दोघे अडून बसले असताना महाविकास आघाडीचा तिन्ही मतदारसंघात प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येकाने एकेक जागा लढवावी, असा तोडगा राष्ट्रवादीने (शरद पवार) सुचविला आहे. जागा वाटपातील तिढ्यावर खुद्द शरद पवार यांनी हा पर्याय मांडल्याने काँग्रेस, शिवसेनेला (ठाकरे गट) एका जागेवरील दावा सोडून तडजोड करावी लागण्याची चिन्हे आहेत.

नाशिक शहरात विधानसभेच्या एकूण चार जागा आहेत, यातील देवळाली हा निम्मा शहरी आणि निम्मा ग्रामीण असा मतदारसंघ आहे. गतवेळी या मतदार संघात एकसंघ राष्ट्रवादीने शिवसेनेला पराभूत केले होते. पक्षातील दुफळीनंतर येथील आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटात सामील झाल्या. त्यामुळे ही जागा शरद पवार गटाकडे राहणार असल्याचे मानले जाते. महाविकास आघाडीत उर्वरित नाशिक मध्य, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या तीन जागांसाठी जोरदार रस्सीखेच होत आहे. हे तिन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. शिवसेना ठाकरे गटाने नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या मतदारसंघांवर तर काँग्रेसने नाशिक मध्य आणि नाशिक पूर्वच्या जागेवर दावा सांगितला आहे. शरद पवार गटाने तीन जागांसाठी मुलाखती घेतल्या. नाशिक मध्य मतदारसंघात गतवेळी काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. नाशिक पूर्वमध्ये भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप हे राष्ट्रवादीकडून लढले.परंतु, त्यांना पराभूत व्हावे लागले होते. नाशिक पश्चिममध्ये अपूर्व हिरे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर मैदानात होते. त्यांचाही पराभव झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर सर्वच मतदार संघांमधील समीकरणे बदलली आहेत.

Embarrassment in Mahavikas Aghadi from Akola East Constituency Assembly Elections 2024 print politics news
अकोला पूर्ववरून महाविकास आघाडीत पेच
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
jarange patil factor impact in assembly elections in marathwada
विश्लेषण : विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’चा प्रभाव किती?
Exchange of assembly seats in Mahavikas Aghadi in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीत जागांची आदलाबदल ?
Nandurbar Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Nandurbar Vidhan Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मताधिक्याचा परिणाम विधानसभेच्या रणधुमाळीत दिसणार का ?
gadchiroli congress marathi news
गडचिरोली : विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची रांग, तीन विधानसभा क्षेत्रासाठी तब्बल २४ जणांनी…
Challenging for the Grand Alliance in Assembly Elections in North Maharashtra print politics news
विधानसभेचे पूर्वरंग: उत्तर महाराष्ट्रात चारही जिल्ह्यांचा स्वतंत्र कौल?
In Uran tensions rise between Shiv Sena Thackeray and Shetkari Kamgar Party ahead of assembly elections
उमेदवारीसाठी शेकाप-ठाकरे गटात चुरस; उरण विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू, काँग्रेसचाही दावा

हेही वाचा >>> काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर ठाकरे, शरद पवार गटांचा डोळा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने नाशिक पूर्व विधानसभा वगळता अन्य मतदारसंघात कमी-अधिक प्रमाणात आघाडी घेतली. यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षात इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. लोकसभेतील मतदान लक्षात घेत तिन्ही पक्षांकडून या जागांवर दावा सांगितला जात आहे. इच्छुकांनी प्रचार देखील सुरू केला आहे. काँग्रेसप्रमाणेच शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार वसंत गिते यांच्यासाठी नाशिक मध्यची जागा प्रतिष्ठेची केली आहे. या जागेवरून उभयतांमध्ये जुंपली असताना शरद पवार गटाने गुगली टाकत ती आपल्याकडे खेचण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पार पडलेल्या मुलाखतीवेळी यावर चर्चा झाली.

हेही वाचा >>> शरद पवारांच्या शिलेदाराविरोधात भाजप आक्रमक

नाशिक मध्यमधून पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे हे इच्छुक आहेत. या जागेवर सलग तीन वेळा काँग्रेसला पराक्षव स्वीकारावा लागला आहे. एकसंघ शिवसेनेलाही २०१४ मध्ये ही जागा जिंकता आली नव्हती. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाला संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी म्हटले आहे. जागा वाटपात नाशिक पश्चिमची जागा शिवसेना ठाकरे गटाला आणि नाशिक पूर्व मतदारसंघ काँग्रेसला सोडला जाईल. विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचे शहरात अस्तित्व राखणे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे शहरात तीनही पक्षांनी प्रत्येकी एक जागा लढवावी, असा पर्याय शरद पवार यांच्याकडून सुचविला गेल्याचे सांगितले जाते.