लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल अनेक अर्थांनी धक्कादायक लागले. खासकरून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या चार राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. खरे तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन्हीही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत मोठी राज्ये आहेत. उत्तर प्रदेश (८० मतदारसंघ) आणि महाराष्ट्र (४८ मतदारसंघ) केंद्रातील सत्तेचे भवितव्य ठरवतात. फक्त महाराष्ट्राचा विचार करता २०१९ च्या निवडणुकीमध्ये २३ जागा मिळवलेल्या भाजपाला या निवडणुकीमध्ये ९ जागा प्राप्त झाल्या आहेत. भाजपाचे सहकारी पक्ष असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (७ जागा) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसलाही (१ जागा) फार काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. या खराब कामगिरीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत फडणवीसांनी ‘मला सरकारमधून मोकळं करा’ अशीही विनंती पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे दिसून आले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (१८ जून) महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा