मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे दोन माजी खासदार, नुकतीच हत्या झालेले बाबा सिद्दिकी यांचे पुत्र व वादग्रस्त नवाब मलिक यांची कन्या आदींना राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) सात जणांच्या दुसऱ्या यादीत स्थान दिले आहे. राष्ट्रवादीने पहिल्या यादीत ३८ उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत सात अशाप्रकारे आतापर्यंत एकूण ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपचे सांगलीतील माजी खासदार संजयकाका पाटील आणि नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. हे दोघेही लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. विधानसभेच्या उमेदवारीसाठी उभयतांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला आहे.

Aheri Legislative Assembly Bhagyashree Atrams candidacy from NCP Sharad Pawar faction sets up father daughter battle
अहेरीत पिता-पुत्रीत थेट लढत; शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Dharmaraobaba Atram is nominated from Aheri by NCP and BJPs claim is futile
‘अहेरी’तून धर्मरावबाबा आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी, भाजपाचा दावा निष्फळ
anna bansode sunil shelke
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळातून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का; विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारासह ‘या’ नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
Satyasheel Sherkar of Congress is the candidate of NCP Sharad Pawar party in Junnar
जुन्नरमध्ये काँग्रेसचे सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार ?
cm Eknath shinde
अजित पवारांना बरोबर घेऊनच निवडणूक लढू! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही, अमित शहांशी चर्चा
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil : भाजपाला धक्का! हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश, विधानसभा निवडणूकही लढवणार

नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा आक्षेप होता. यामुळेच त्यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मलिक यांना महायुतीत घेण्यास हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे मलिक यांच्या उमेदवारीस भाजप आक्षेप घेईल, हे लक्षात घेऊनच अजित पवार यांनी त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकतीच हत्या झालेले माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला होता. परंतु त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात होते. त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> परंड्यात आघाडीत बिघाडी? ठाकरेंची सेना-मोठ्या पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने

रोहित पाटील विरुद्ध संजयकाका पाटील

सांगलीच्या तासगाव मतदारसंघात या वेळी राष्ट्रवादीने (शरद पवार) आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र लढण्याच्या तयारीत होते. पण भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्वेक्षणात संजयकाकांच्या मुलाचा निभाव लागणे कठीण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामुळे ल्संजयकाका पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला व त्यांनाउमेदवारी जाहीर करण्यात आली.

प्रताप चिखलीकर राष्ट्रवादीतून रिंगणात

नांदेडमधून प्रताप चिखलीकर यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश घेत त्यांना लोहा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार) जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील यांना, तर वडगाव-शेरी मतदारसंघातून वादग्रस्त आमदार सुनील टिंगरे यांना पक्षाने फेर उमेदवारी दिली आहे.