मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्व समाजघटकांना खूश करताना यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद मदतीच्या दुपटीने मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ लाखो कटुंबांना होणार आहे.

केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर राज्यातही नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास बाधितांना या निधीच्या माध्यमातून मदत केली जाते.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

निकष काय?

या मदतीमधील ७५ टक्के वाटा केंद्राचा, तर २५ टक्के भार राज्य सरकारवर असतो. केंद्र सरकारने गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना देण्यात येणाऱ्या मदतीत- नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदतीत (२०२२-२३ ते २०२५-२६) या कालावधीसाठी भरीव वाढ केली आहे. त्यानुसार भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमवर्षाव, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट, यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद मदतनिधीतून बाधितांना मदत मिळते, तर राज्यात केंद्राच्या निकषाशिवाय वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग, अवेळी पाऊस, अतिवृष्टी यासाठीही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत केली जाते.

हेही वाचा >>> कारण राजकारण: विखेंविरोधात ‘मविआ’ला भाजप नाराजांची मदत?

राज्यातील महायुती सरकारने २७ मार्च २०२३ रोजी केंद्राच्या धोरणाप्रमाणेच राज्यातही आपत्तीबाधितांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन २७ मार्च २०२३चा निर्णय शिथिल करीत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सध्याच्या मदतीपेक्षा दुपटीने मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागातील सूत्रांनी दिली.

निर्णय काय?

महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार यंदाच्या मान्सूनमध्ये म्हणजेच जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना पुरेशी मदत तातडीने मिळावी यासाठी विशेष दराने मदत देण्यात येणार आहे. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास प्रतिकुटुंब कपडयांच्या नुकसानीसाठी पाच हजार आणि घरगुती भांडी, वस्तूंच्या नुकसानीसाठी पाच हजार असे १० हजार रुपये लगेच देण्यात येणार आहेत. यावेळी घर दोन दिवस पाण्यात बुडाल्याची अटही शिथिल करण्यात आली असून केवळ घरात पाणी शिरुन नुकसान झाले तरीही मदत मिळणार आहे. तर दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे टपरीधारकांना मदत देण्याची तरतूद राज्य आपत्ती निधीत नसली तरी यंदा मात्र मतदार यादीत नाव असलेल्या टपरीधारकांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपये मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.