Maharashtra govt formation : राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या आठवड्यात ते ३४ वर्षांपासून राहत असलेल्या, त्यांच्या दिल्लीतील २६, गुरुद्वारा रकाबगंज रोड, या निवसास्थानी दुपारच्या जेवणाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातील झालेल्या मोठ्या राजकीय बदलाचे उदाहरण होते. प्रफुल्ल पटेलांनी माध्यम प्रतिनिधींना पवार कुटुंबाची भेट घेता यावी यासाठी हे आयोजन करण्यात आले होतेय. पटेल यांनी यापूर्वीदेखील असंख्य वेळा असा कार्यक्रम आयोजित केला आहे. पण या प्रसंगी उपस्थित पवार मात्र वेगळे होते. यावेळी शरद पवार किंवा त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या त्या ठिकाणी नव्हत्या तर त्याऐवजी शरद पवारांचे पुतणे अजित पवार, लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचा मुलगा पार्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे खासदार सुनील तटकरे हे हजर होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कधीकाळी शरद पवारांचा उजवा हात असलेले प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमात अजित पवार यांची ओळख राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींना करून देत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत ४१ जागा जिंकल्या आहेत, तर त्यांच्या काकांना (शरद पवार) फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले आहे.
विशेष म्हणजे, अजित पवार या कार्यक्रमात वेगळ्याच रुपात पाहायला मिळाले, त्यांनी कॅज्युअल शर्ट-ट्राउझर्स आणि जॅकेट घातले होते, ते प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबईत नव्या सरकारच्या स्थापनेबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. यावेळी अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री बनतील आणि अर्थखातेही त्यांच्याकडेच राहणार असे संकेत मिळत होते.
विधानसभेच्या निकालानंतर भाजपा १३२ जागा जिंकून इतर सर्व पक्षांपेक्षा खूप पुढे असल्याचे दिसून आले. यानंतर अजित पवारांनी घाई करत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. म्हणजेच अनपेक्षित काही घडले तर अजित पवार सोबत असतील हे निश्चित झाले. त्यानंतर जर काही वेगळे घडलेच तर ते महायुतीतील तिसरा सहकारी असलेल्या एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून घडू शकते.
यादरम्यान सोमवारपर्यंत म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला (१८८ पैकी २३६ जागा) प्रचंड बहुमत देऊन नऊ दिवस उलटल्यानंतरही, युती नवीन सरकारची रूपरेषा ठरवू शकलेली नाही. विचित्र गोष्ट म्हणजे अजूनही भाजपाने सत्तास्थापनेचा आपला दावा सादर केला नाही किंवा राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले नाही.
हेही वाचा>> “मी शिंदेंना तेव्हाच सांगितलं होतं की भाजपाकडून…”, बच्चू कडूंचा दावा; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं भाष्य!
सत्ता स्थापनेत कोणाला किती वाटा मिळणार याबद्दल महायुतीमध्ये आणखीही चर्चाच सुरू आहेत. भाजपाने अद्याप आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील जाहीर केलेला नाही. दुसरीकडे अजित पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांसमोर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा घेतील त्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या १३२ जागांवरील विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस मानले जात आहेत, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याशिवाय भाजपाकडे खूप कमी पर्याय आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तिसगड येथे ज्या प्रकारे अनुक्रमे भजन लाल शर्मा, मोहन यादव किंवा विष्णू देव साई यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली त्याप्रमाणे भाजपा महाराष्ट्रात प्रयोग करू शकत नाही.
महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रशासकीय अधिकार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यातील पायाभूत सुविधा आणि विकास योजनांना पुढे घेऊन जाण्यासाठी अनुभवी आणि स्थिर असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हरियाणा आणि महाराष्ट्रात मेहनत घेऊन भाजपाला विजय मिळवून दिला, त्यांच्याकडूनही मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होण्याचे यापूर्वी फडणवीसांनी मान्य केले होते, हे लक्षात घेतले तरी भाजपाचे कार्यकर्त्यांना फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूती आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सध्या एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यांची जात. ब्राम्हण असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन मराठा नेते उपमुख्यमंत्री झाले तर विधानसभेत सोबत आलेल्या ओबीसी समाजाला भाजपाला मोठ्या कौशल्याने आपल्यात समावून घ्यावे लागेल. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपामध्ये मराठा समाजाचा चेहरा असणारे विनोद तावेडे यांच्या सारख्या नेत्यांशी चर्चा करून, फडणवीस मोठे झाल्यास मराठा समाजावर काय परिणाम होईल हे जाणून घेतले आहे.
हेही वाचा>> शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीला वेग; भाजपाकडून पाहणी, शिवसेनेत नाराजी? नेते म्हणाले, “…
२०१४ ते २०१९ ही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची राजवट ‘वन मॅन शो’ म्हणून लक्षात ठेवली जाते. पण यामुळे पक्षांतर्गत काही पडझड देखील झाली. यादरम्यान त्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी वेळ घेऊन, पक्षाला विजय जरी फडणवीसांमुळे मिळाला असला आणि ते मुख्यमंत्री जरी झाले तरीही नियंत्रण आमच्याकडेच आहे असा संदेश देण्याचा भाजपा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न असू शकतो.
दिल्लीत भाजपाबरोबर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना अचानक आलेले आजारपण आणि त्यांचे मूळ गावी निघून जाणे हे काही प्रमाणात भुवया उंचावणारे होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहमंत्री पदाची मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे. पण भाजपाकडून गृहमंत्रीपद सोडले जाणे शक्य नाही, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतानादेखील हे पद त्यांच्याकडेच होते.
एकनाथ शिंदे यांनाही माहीत आहे की त्यांच्याकडे फार डावपेच नाहीत. दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात जाणे किंवा नवीन सरकारला बाहेरून पाठिंबा देणे हे पर्याय असू शकत नाहीत. कारण महाराष्ट्रात सत्तेबाहेर राहणे म्हणजे जनतेच्या मनातून बाहेर जाणे ठरू शकते.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या (शिंदे) ५७ जागांची आवश्यकता असल्याने भाजपाकडून शिंदेंची मनधरणी केली जातेय असं नाही. तर महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरेंना कमजोर करण्यासाठी शिंदेंची भाजपाला आवश्यकता आहे. कारण शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने विधासभा निवडणुकीत जिंकलेल्या एकूण २० जागांपैकी १० जागा मुंबईतल्या आहेत.
हेही वाचा>> विधानसभेतील अपयशानंतर शरद पवार मोठा निर्णय घेणार? रोहित पवारांचं सूचक विधान; म्हणाले,…
े
२०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांनी ऐकले होते. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी मराठा समाजाचा उगवता नेता म्हणून स्वत:साठी राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे देखील त्यांच्याबद्दल मृदू भूमिका घेताना दिसतात.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वर्षभरात लागू करण्यासाठी योजना सुचवाव्या यासाठी वरिष्ठ अधिकार्यांची एक समिती स्थापन केली होती. इतकेच नाही तर शिंदेंनी लाडकी बहीण योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी नाही तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला उशीर करून, एकनाथ शिंदे हे या परिस्थितीचा फायदा घेत स्वत:ची सर्वात मोठा मराठा नेता अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे.