मुंबई : महाराष्ट्र थेट विदेशी गुंतवणुकीत देशात पुन्हा अव्वल ठरला आहे. राज्यातील विदेशी गुंतवणुकीच्या वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यांमध्ये झाली आहे. महाराष्ट्र हा देशात अग्रेसर असून आता तो थांबणार नाही, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
देशातील परकीय गुंतवणुकीची
२०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरपर्यंतच्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या ४ वर्षांमध्ये सरासरी एक लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यात आली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.औद्योगिक आघाडीवरील राज्याची घोडदौड पुढेही कायम राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
राज्यातील विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी :
२०२०-२१ : १,१९,७३४ कोटी
२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी
२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी
२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी
२०२४-२५ (एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात) : १,१३,२३६ कोटी