BJP election strategy in maharashtra : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीने २८८ पैकी तब्बल २३० जागा जिंकत बहुमतात सत्ता स्थापन केली. दरम्यान, महायुतीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाचे श्रेय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले जात आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने बावनकुळे यांना तिकीट नाकारले होते. मात्र, त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत बावनकुळे यांनी पक्षाचे नेतृत्व केले.

त्यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपाने १३२ जागा जिंकत दणदणीत विजय साकारला. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बावनकुळे यांनी निवडणुकीसाठी भाजपाची यशस्वी रणनीती, मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड आणि नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

ईव्हीएमबाबत विरोधकांच्या आरोपांकडे तुम्ही कसे बघता?

“विधानसभा निवडणुकीत आलेलं अपयश महाविकास आघाडीच्या नेत्यांना मान्य नाही. जनतेने महायुतीला दिलेला कौलही ते स्वीकारायला तयार नाहीत. निवडणुकीसाठी भाजपाने जे नियोजन केले ते कुणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं. लोकसभेच्या निकालानंतर विरोधक अतिआत्मविश्वासात होते. परंतु आम्ही संयम राखला. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विश्वास दिला”, असं उत्तर बावनकुळे यांनी दिलं.

हेही वाचा : Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?

विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाची मुख्य कारणं काय?

“विधानसभेच्या २८८ जागांवर पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी आम्ही किमान ३२ निकषांवर लक्ष केंद्रित केले. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर असलेल्या ३५ संघटनांनीही ही जबाबदारी मनापासून उचलली”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजपाची बूथ व्यवस्थापनाची रणनीती काय होती?

बावनकुळे म्हणाले, “लोकसभेच्या निकालातून धडा घेत आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने बूथचे नियोजन केले. ३८,८०९ बूथ पहिल्या श्रेणीत होते, जिथे आम्हाला लोकसभा निवडणुकीत ५० टक्के पेक्षा जास्त मतदान झाले होते. तर २९,१२९ बूथ दुसऱ्या श्रेणीत होते, जिथे पक्षाला ३५ ते ५० टक्के मतदान झालं होतं. तिसऱ्या श्रेणीत २०, २७४ बूथ होते, जिथे आम्ही २० ते ३५ टक्के मते घेतली होती. चौथ्या श्रेणीतील ११,३३४ बूथमध्ये आम्हाला २० टक्के पेक्षाही कमी मते मिळाली होती. यामुळे आम्हाला आमची ताकद आणि कमकुवत बाजू ओळखण्यास मदत झाली. त्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांना हाताशी धरून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे महायुतीच्या मतांची एकूण टक्केवारी २.४८ कोटींवरून ३.११ कोटी झाली. महाविकास आघाडीच्या मतांची टक्केवारी २.५० कोटींवरून २.१७ टक्क्यांपर्यंत घसरली. याचा आम्हाला मोठा फायदा झाला.”

महायुतीच्या जागावाटपाची रणनिती कशी ठरली?

“भाजपाने केवळ १४९ जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी १३२ जागांवर आमचे उमेदवार निवडून आले. आम्ही २८८ जागांवर रणनीती आखली आणि ती अंमलात आणली. भाजप-शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही उमेदवारांमध्ये आम्ही भेदभाव केला नाही,” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले? 

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका काय होती?

बावनकुळे म्हणाले “विधानसभा निवडणुकीत आम्ही विविध भागात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. आमचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आम्हाला निर्णय घेण्यास मोकळीक दिली होती. चुका झाल्यानंतरही तेव्हा आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी दोन महिने महाराष्ट्रात राहून ओबीसी, दलित आणि आदिवासी मतदारांसोबत चर्चा केली. नितीन गडकरी यांनीही राज्यात ६५ सभा घेतल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाषणं प्रभावी ठरली.”

ओबीसी विरुद्ध मराठा मतांचे ध्रुवीकरण झाले का?

“विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना भाजपाने ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या ३५३ पोटजातींना विश्वासात घेतले. या रणनीतीचा सकारात्मक परिणाम झाला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेत्यांना विशेषत: देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका केली. परंतु, आम्हाला मराठा समाजाचा चांगला पाठिंबा मिळाला. कारण मराठवाड्यात महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या.”, असं उत्तर बावनकुळे यांनी दिलं.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?

बावनकुळे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार याबाबत कोणालाही शंका नव्हती. कारण, गुणवत्तेच्या आधारावर ते खरोखरच मुख्यमंत्रीपदासाठी पात्र आहेत. जून २०२२ मध्ये जेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले होते. अनेकांची मने दुखावली होती, फडणवीस हेच चांगले प्रशासक असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं.”

BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदावरून नाराज आहेत का?

“एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यामुळे ते नाराज असतील असं मला वाटत नाही. कारण, त्यांनी अडीज वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवली. माझं असं वैयक्तिक मत आहे की, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला एकनाथ शिंदे यांचा विरोध नव्हता. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांच्याही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे.”

महायुतीतील संघर्षामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडलाय का?

“तसे अजिबात नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही एकत्रितपणे काम करीत आहेत. एवढा मोठा जनादेश मिळाला म्हटलं की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आकांक्षाही उंचावतात. सरकारमध्ये ४३ मंत्र्याची मर्यादा पाहता काही प्रमाणात चर्चा व्हायलाच हवी. मात्र आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.”

Story img Loader