Dhananjay Munde Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे महायुती सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या केंद्रस्थानी सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांची ओळख आहे. गेल्या दोन दशकांच्या राजकीय कारकीर्दीत ते अनेकदा वादात सापडले आहेत.

Bjp election strategy through government schemes
सरकारी योजनांच्या माध्यमातून भाजपची निवडणूक मोर्चेबांधणी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
delhi assembly election 2025
लालकिल्ला : भाजपसाठी वर्ग ठरला ‘धर्म’!
राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका

हेही वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करत आहेत?

धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द

धनंजय मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा या गावात झाला. महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचा प्रवास अत्यंत चढ-उतारांनी भरलेला आहे. धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला त्यांचे काका भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला. २००७ मध्ये त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आपल्या वक्तृत्व शैलीमुळे अत्यंत कमी कालावधीत धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास जिंकला.

गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणात व्यग्र असताना धनंजय मुंडे यांनी बीडमधील कुटुंबाचे राजकीय हितसंबंध जोपासले. याशिवाय परळी विधानसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांना एकजुटीने ठेवले. त्यावेळी धनंजय हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असतील असे अनेकांना वाटत होते. परंतु, २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची निवड केली. काकांच्या निर्णयामुळे धनंजय मुंडे नाराज झाले. २०१० मध्ये भाजपाने धनंजय मुंडे यांची राज्यसभेवर निवड केली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी आपल्या जवळील व्यक्तीची निवड करण्याचा आग्रह धनंजय मुंडे यांनी धरला होता. मात्र, त्यांच्या या मागणीला गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केल्याने काका-पुतण्यांमधील संबंध आणखीच दुरावत गेले. बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचा प्रभाव वाढत असल्याने गोपीनाथ मुंडे त्यांना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करण्यात आला. यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.

२०१२ मध्ये धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वडील पंडितराव मुंडे यांच्यासह त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. मात्र, या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा तब्बल २५ हजार मताधिक्याने पराभव झाला आणि पंकजा मुंडे निवडून आल्या. त्यानंतर शरद पवार यांनी विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची निवड केली.

परळी विधानसभेतून पहिल्यांदा विजयी

२०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येतील, असा अंदाज बीडकरांनी बांधला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं. बहीण-भावामध्ये रंगलेला निवडणुकीचा सामना संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, भावनिक राजकारणात परळीकरांनी धनंजय मुंडे यांच्या झोळीत भरघोस मतं टाकली. पंकजा मुंडे यांचा तब्बल ३० हजार मताधिक्याने पराभव करून धनंजय मुंडे पहिल्यादा विधानसभेवर निवडून आले.

त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीने सत्तास्थापन केल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालं. या काळात त्यांनी अजित पवार यांचे सर्वात विश्वासू नेते म्हणून ओळखही मिळवली. २०२२ मध्ये एकसंध राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना साथ दिली. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेंकडे कृषिमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय पुन्हा मुंडे एकत्र आले. त्यांनी बहिणीसाठी निवडणुकीत जोरदार प्रचार देखील केला. मात्र, बीडकरांनी पंकजा मुंडे यांना नाकारत शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना निवडून दिले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक धनंजय मुंडे यांच्यासाठी सोपी नव्हती. कारण, शरद पवार यांनी त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. मात्र, धनंजय मुंडे यांनी आव्हान पेलत परळी विधानसभा मतदारसंघातून तब्बल १ लाख ४० हजार मताधिक्याने विजय मिळवला.

अजित पवारांबरोबर जवळचे संबंध

धनंजय मुंडे हे छगन भुजबळांनंतर राष्ट्रवादीतील मोजक्या ओबीसी नेत्यांपैकी एक नेते आहेत. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचे नाव विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी सुचवले होते. यासाठी त्यांनी शरद पवार यांची मनधरणी केली होती. धनंजय मुंडे यांना पक्षात महत्वाचे स्थान देण्यासाठी अजित पवार आग्रही होते. मात्र, त्यांच्या या भूमिकेला पक्षातून अनेकदा विरोध झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त मराठा समाजाचे नेतृत्व करत असल्याचा अनेकांचा समज होता. त्यासाठी पक्षात छगन भुजबळ यांच्याबरोबर धनंजय मुंडे यांना देखील महत्वाचे स्थान दिले पाहिजे, असं अजित पवारांचे मत होते.

हेही वाचा : Delhi Elections 2025 : भाजपाला दिल्ली दूरच… ‘आप’ने दशकभर वर्चस्व कसं राखलं?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांना साथ

नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत पहाटेचा शपथविधी उरकला होता. त्यावेळी काही निवडक नेत्यांमध्ये धनंजय मुंडे हे देखील त्यांच्याबरोबर होते. परंतु, शरद पवार यांच्या डावपेचामुळे हा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर अजित पवार हे पुन्हा शरद पवार यांच्या छायेत आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्यांनी शरद पवार यांच्यावर जाहीर टीका देखील केली होती. “१९७८ पासून शरद पवार यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे”, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी अकोला येथील सभेत केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यांना प्रत्युत्तर दिलं. बीडचा आदर्श उद्ध्वस्त करणाऱ्यांना पराभूत करा आणि राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा, असं आवाहन शरद पवार यांनी परळीकरांना केलं होतं.

धनंजय मुंडे अनेकदा वादात

धनंजय मुंडे यांच्या वागणुकीमुळे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत असल्याचा आरोप काही नेत्यांनी केला होता. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी धनंजय मुंडे यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोप करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस हे एकेकाळी राष्ट्रवादीत होते. २०१७ मध्ये धनंजय मुंडे यांच्याबरोबर मतभेद झाल्यामुळेच ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते, असं सांगितलं जातं. सध्या बीडमधील भाजपाचे आमदार धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत असल्याचं दिसून येत आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची हकालपट्टीची मागणी करतानाच त्यांना बीडचे पालकमंत्रीपद सुद्धा देऊ नये, अशी मागणी एकमुखाने करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना विरोध होण्याचं प्रमुख कारण म्हणजे, बीड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत ते पक्षपातीपणा करत आहेत. महत्वाच्या पदावर त्यांनी आपल्या समाजातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप होत आहे.

धनंजय मुंडेंवर झाला होता बलात्काराचा आरोप

दरम्यान, धनंजय मुंडे अनेकदा वैयक्तिक वादातही सापडले आहेत. २०२१ मध्ये एका तरुणीने त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यावर त्यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे यांनीही अनेक आरोप केले आहेत. परंतु, याचा फारसा परिणाम त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर झालेला नाही.

मात्र, यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आल्याचे सांगितलं जात आहे. कारण, या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे या कठीण प्रसंगाला नेमके कसे सामोरे जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader