Ajit Pawar vs Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे ५९ पैकी तब्बल ४१ आमदार निवडून आले. महायुतीला बहुमताचा आकडा पार करून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोलाची भूमिका ठरली. दरम्यान, गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. यावेळी अजित पवार यांनी सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभेची निवडणूक अजित पवार यांच्यासाठी इतकी सोपी नव्हती. त्यांचा राजकीय प्रवास दिवसेंदिवस खडतर होत असल्याचं दिसून येत होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकसभा निवडणुकीत आलं होतं अपयश
४ महिन्यांपूर्वी अजित पवार हे आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सर्वात खालच्या टप्प्यावर आले होते. कारण, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता. ५ पैकी फक्त एकाच जागेवर त्यांचा उमेदवार निवडून आला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. जवळपास दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडत शिंदे-भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी पक्षातील ४० आमदारही आपल्यासोबत नेले होते. महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांना घवघवीत यश मिळालं खरं, पण आता कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?
इतकंच नाही तर, निवडणूक आयोगात धाव घेत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हही आपल्या पदरात पाडून घेतलं. पण, शरद पवार यांना जनतेतून सहानुभूती मिळाल्याने अजित पवार यांच्यासमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं. विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या मित्रपक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोका निर्माण होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ बांधत होते. शरद पवार यांना निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळेल आणि अजित पवार यांच्या पक्षाचा दारुण पराभव होईल, असंही अनेकांचं म्हणणं होतं. त्यामुळे अजित पवार विधानसभेसाठी नेमकी काय रणनिती आखणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या.
शरद पवारांचं आव्हान पेललं
दरम्यान, शरद पवार यांनी दिलेल्या आव्हानाचा सामना करत अजित पवार यांनी निवडणूक काळात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवत त्यांनी मतदारांना आपल्याकडे खेचून आणले. अखेर राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज खोटे ठरले, २३ नोव्हेंबरला लागलेल्या विधानसभा निकालात अजित पवार यांच्या पक्षाचे तब्बल ४१ उमेदवार निवडून आले. दुसरीकडे शरद पवार यांना फक्त १० जागांवरच विजय मिळवता आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याचे उत्तरही महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीतून मिळाले. दरम्यान, गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आणखी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक (६ वेळा) उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान देखील त्यांनी पटकावला आहे.
सहकार क्षेत्रातून राजकारणात प्रवेश
अजित पवार हे राजकारणातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय नेते मानले जातात. शरद पवार यांचे बंधू अनंतराव पवार यांचे ते पुत्र आहेत. सहकार क्षेत्रात काम केल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि विधानसभेची निवडणूक जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये अजित पवार यांना कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्रीपद देण्यात आले. काही दिवसानंतर पाणीपुरवठा आणि अर्थ व नियोजन ही महत्वाची खातेही त्यांच्याकडे आली. शरद पवार यांनी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा अजित पवार यांनी राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना पक्षात सामील करून घेतले.
मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा
१९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. त्यांनी काँग्रेसबरोबर युती करत राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये अजित पवार यांनी जलसंपदा खात्याचा पदभार स्वीकारत महाराष्ट्रातील बऱ्याच ग्रामीण भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. दरम्यान, २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील क्रमांक १ चा पक्ष ठरला होता. त्यावेळी अजित पवारांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा तयार झाली. मात्र, शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊन इतर महत्वाची खाती आपल्या पदरात पाडून घेतली. तेव्हा काका-पुतण्यांमध्ये (शरद पवार-अजित पवार) वादाची पहिली ठिणगी पडली.
हेही वाचा : Eknath Shinde : महायुतीच्या जहाजाला गती देणाऱ्या एकनाथ शिंदेंपुढे आता उपमुख्यमंत्री म्हणून कुठली आव्हानं?
उपमुख्यमंत्रीपदाचा दिला होता राजीनामा
२०१४ पर्यंत अजित पवार यांनी आघाडी सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांचा पदभार स्वीकारून महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये स्थान मिळवले. २०१० मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये अजित पवार यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते आज २०२४ पर्यंत अजित पवार यांनी तब्बल ६ वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. प्रशासकीय यंत्रणेवर मजबूत पकड ठेवणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. २०११ मध्ये सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांना विश्वासात न घेता उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांना तुरुंगात टाकू, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांना थेट आव्हान दिलं होतं.
४० आमदारांना घेऊन भाजपाबरोबर हातमिळवणी
२०१९ मध्ये केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा संदर्भात नोटीस पाठवली होती. त्यावेळीही अजित पवार हे आमदारकी पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत होते. परंतु, शरद पवार यांनी तसे करण्यापासून त्यांना रोखले. एकीकडे तपास यंत्रणांचा दबाव अजित पवार यांच्यावर वाढत असल्याचं दिसून येत होतं. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किती दिवस राजकारण करायचे? असा प्रश्न अजित पवार यांना सतत भेडसावत होता. त्यामुळेच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच काही आमदारांना सोबत घेऊन भाजपाबरोबर हातमिळवणी केली.
देवेंद्र फडणवीसांबरोबर पहाटेचा शपथविधी
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी करत महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी दिली. मात्र, अजित पवार यांना समर्थन देणारे सर्व आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले. परिणामी सरकारचं बहुमत कमी झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपाची कास धरलेले अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या सरकारमध्ये अजित पवार यांनी अर्थमंत्री पदही चांगल्या पद्धतीने हाताळलं. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
हेही वाचा : Eknath Shinde: शपथविधीच्या दोन तास आधी एकनाथ शिंदे झाले राजी; पडद्यामागे नेमकं असं काय घडलं?
अगदी वर्षभरातच अजित पवार यांनीही शरद पवार यांची साथ सोडत युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन अजित पवार महायुतीत सामील झाले आणि पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेला पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या सहमतीमुळेच झाला होता, असा दावा अजित पवार नेहमी करीत असतात. आपल्या भाषणांमधून ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकाही करतात. लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रातील जनतेला काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत पाहायला मिळाली.
लोकसभेतील पराभवाचा बदला विधानसभेत
शरद पवार यांनी लोकसभेत अभूतपूर्व यश मिळवत १० पैकी ८ जागा जिंकत अजित पवारांना चितपट केलं होतं. मात्र, या पराभवाचा बदला अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत घेतला. त्यांनी पक्षाचे तब्बल ४१ आमदार निवडून आणले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, “२०१४ ते २०१९ हा ५ वर्षांचा कार्यकाळ वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सत्तेत राहिला आहे. यंदाही राज्यातील जनतेने महायुतीला बाजूने कौल दिला असून आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे पुढील ५ वर्ष महायुती सरकारला कोणताही धोका नाही. आमचं सरकार सुरळीत चालेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सामील झाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेकदा मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याआधी महायुती सरकारमधील मुख्यमंत्रीपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडे होती. परंतु, नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणे अजित पवार यांना अधिक सोयीचं ठरू शकतं. कारण, २०१९ मध्ये भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीपासूनच दोन्ही नेत्यांमध्ये चांगलं समीकरण जुळलं आहे.