Amit Shah vs Sharad Pawar News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. या टीकेचा पवारांनी चांगलाच समाचार घेतला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करणं टाळलं. दरम्यान, काही महिन्यांच्या अंतरानंतर शाह आणि पवार यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत दोन्ही नेते आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

अमित शाह शिर्डीतील बैठकीत काय म्हणाले?

गेल्या रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डी येथे भाजपा कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. “विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाने शरद पवार यांचं विश्वासघाती राजकारण संपवलं आहे. १९७८ पासून पवारांनी जे दगाफटक्याचं राजकारण केलं ते महाराष्ट्रातील जनतेने २० फूट जमिनीखाली गाडलं आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी तब्बल २३० जागांवर दणदणीत विजय मिळवला. यातील १३२ जागा एकट्या भाजपाने जिंकल्या. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ ४६ जागांवरच समाधान मानावं लागलं.

Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Intruder entered in Jeh bedroom Saif Ali Khan's staff narrates attack sequence
जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये…; सैफ अली खानच्या घरात काय घडलं? करीना कपूर कुठे होती? मदतनीसने सगळंच सांगितलं
allahabad high court justice shekhar kumar yadav
Justice Shekhar Yadav: वाद होऊनही अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ‘त्या’ विधानावर ठाम; म्हणाले, “मी नियम मोडलेला नाही”!
Maharashtra Live News Updates in Marathi
Saif Ali Khan Health Updates : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; मुंबई पोलिसांची माहिती
loksatta editorial on ceasefire between israel and hamas
अग्रलेख : मर्दुमकीच्या मर्यादा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?

अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर

अमित शाह यांच्या टीकेला शरद पवार यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिलं. “केंद्रीय गृहमंत्री म्हणून याआधी कोणत्याही नेत्यानं इतका अतिरेक केला नव्हता. अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी गृहमंत्रालय सांभाळलं आहे. परंतु, त्यांच्यापैकी कुणालाही राज्यातून ‘तडीपार’ करण्यात आलं नव्हतं. सर्व नेते गृहमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात देशासाठी महत्त्वाचे योगदान देणारे होते”, असं शरद पवार यांनी म्हटलं.

१९७८ च्या पुलोद सरकारची (पुरोगामी लोकशाही दल) माहिती देताना शरद पवार म्हणाले की, “त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू आडवाणी यांच्यासारखे कर्तृत्ववान नेते होते. आमच्या सरकारने महाराष्ट्रात चांगलं काम केलं होतं.” दरम्यान, जनसंघ हे भाजपाचं आधीचं नाव होतं.

१९७८ मध्ये राजकारणात काय घडलं होतं?

१९७८ मध्ये शरद पवार हे त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमधून बाहेर पडले. जनता पार्टीबरोबर हातमिळवणी करून त्यांनी राज्यात ‘पुलोद’ सरकार स्थापन केलं. वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपद सांभाळलं. तर हशू आडवाणी हे नगरविकास खात्याचे मंत्री होते. दरम्यान, १८ महिन्यानंतर लोकशाही दलाचं कोसळलं होतं.

लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला विरोध करण्यासाठी विरोधकांनी जनसंघाची मोट बांधली होती. लोकसभा निवडणुकीत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीने अभूतपूर्व विजय मिळवला आणि इंदिरा गांधींना सत्तेतून बाहेर केलं. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारून तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. वर्षभरानंतर काँग्रेसमध्ये ‘इंदिरा काँग्रेस’ आणि ‘रेड्डी काँग्रेस’ असे दोन गट निर्माण झाले. तेव्हा शरद पवार यांनी रेड्डी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?

महाराष्ट्रात काँग्रेसच्या दोन्ही गटाचे सरकार

१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांविरोधात लढले. त्रिशंकू निवडणूक झाल्यामुळे जनता पार्टीला मोठा फायदा झाला. त्यांनी राज्यातील सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. परंतु, काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मिळून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात सत्तास्थापन केली. शरद पवारांना उद्योग आणि कामगार मंत्रिपद देण्यात आलं. परंतु, अवघ्या साडेचार महिन्यातच पवार ४० आमदारांसह सरकारमधून बाहेर पडले. परिणामी आघाडी सरकारचं बहुमत कमी झाल्याने वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

१९७८ मध्ये शरद पवार पहिल्यांदाच मुख्यमंत्री

१९७८ मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार सत्तेत आलं. शरद पवार यांनी जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाबरोबर हातमिळवणी करून राज्यात ‘पुलोद’चे सरकार स्थापन केलं. दरम्यान, १९८० मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा इंदिरा गांधी यांचं सरकार आलं आणि त्यांनी महाराष्ट्रातील पुलोद सरकार बरखास्त केलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला. ए.आर अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शरद पवार यांनी विरोधी पक्षातच राहणं पसंत केलं. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं. त्यानंतर शरद पवार हे विरोधी पक्षनेते झाले. १९८७ मध्ये शरद पवारांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शरद पवारांनी अमित शाहांना ‘तडीपार’ का म्हटलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी २०१० मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन शेख फेक एन्काउंटर प्रकरणाचा उल्लेख केला. ज्यामध्ये अमित शाह यांना गुजरातमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं होतं. नंतर त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान, अमित शाह यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. या टीकेचाही शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

शरद पवार म्हणाले की, “जेव्हा या महाशयांना (अमित शाह) गुजरातमधून तडीपार करण्यात आलं. तेव्हा मुंबईला येऊन ते बाळासाहेब ठाकरे यांना भेटले आणि आपल्याला सहकार्य करण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे यांना याबद्दल अधिक माहिती असेल. दुर्देवाने एखादा माणूस किती खालची पातळी गाठू शकतो हे यावरून दिसून येतं. मला असं वाटतं की, शाह यांच्या विधानांना त्यांच्या पक्षाकडून देखील महत्व दिलं जाणार नाही.”

अमित शाहांना गुजरातमधून तडीपार का केलं होतं?

गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री असताना अमित शाह यांनी सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि गुन्हेगारी सहकारी तुलसीराम प्रजापती यांचे एन्काउंटर करण्याचा पोलिसांना आदेश दिला होता असा आरोप करण्यात आला. या प्रकरणानंतर २०१० मध्ये शाह यांना सीबीआयने अटक केली होती. तीन महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. परंतु, दोन वर्षांसाठी अमित शाह यांना गुजरातमधून तडीपार करण्यात आलं. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना गुजरातमध्ये परतण्याची परवानगी दिली. यानंतर अमित शाह यांनी नारनपुरा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी शाहांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं.

भाजपा नेत्यांचं शरद पवार यांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनी अमित शाहांचा उल्लेख ‘तडीपार’ असा केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. “शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने टीका करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. अमित शाह यांना न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधून निर्वासित (तडीपार) करण्यात आले होते. परंतु, त्यांच्यावर कोणत्याही दरोड्याचा किंवा गुन्ह्याचा आरोप सिद्ध झाला नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केली आहे”, असं तावडे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?

अमित शाह पुण्यातील अधिवेशनात काय म्हणाले होते?

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली होती. पुण्यातील भाजपाच्या अधिवेशनात शाह यांनी पवारांना भ्रष्टाचाराचे गॉडफादर असं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी दिलेल्या प्रत्युत्तराची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करणं टाळलं होतं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी पवार आणि शाह यांच्यामध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे.

अमित शाह हे शरद पवारांवर टीका का करत आहेत?

काही राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की, महाराष्ट्रातील राजकारणावर पूर्णत: वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अमित शाह हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. एका विश्लेषकाच्या मते, “संसदेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्वच ठिकाणी पक्षाची सत्ता असायला हवी, असं भाजपा नेत्यांना वाटतं. पक्षाच्या शिर्डी येथील बैठकीतून हाच संदेश निघाला आहे.”

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना अपयश

विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर ८४ वर्षीय शरद पवार हे त्यांच्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. अजित पवार यांनी ४० आमदारांसह महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी १० पैकी ८ जागा जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना ९० पैकी केवळ १० जागाच जिंकता आल्या. दरम्यान, अमित शाह यांच्या टीकेला प्रत्यु्त्तर देऊन कठीण प्रसंगातही आपण माघार घेणार नाही, असा संदेश देण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे.

Story img Loader