CM Devendra Fadnavis News : एकीकडे सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटकपक्ष – भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने कौतुक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. “विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं बंद केलं असून ते आता पुष्पगुच्छ पाठवत आहेत”, असं फडणवीस यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विशेष बाब म्हणजे, एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. मात्र, शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शनिवारी माध्यमांबरोबर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार? सामनातील अग्रलेखामुळे चर्चा कशासाठी?
सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्याचा संदर्भ देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महायुती सरकारमध्ये केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच काम करत आहेत. दुसरे कोणतेही मंत्री सक्रिय दिसत नाहीत. काही मंत्र्यांनी त्यांना मिळालेल्या खात्यांचा पदभारही स्वीकारलेला नाही. यामुळे पुढील काळात आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच पत्रव्यवहार करावा लागेल.”
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी देखील गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने स्वीकारली होती. अनेकदा ते गडचिरोलीला जात होते, त्यांचं चांगलं काम आज देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात आहेत. जिल्ह्य़ात विकासाची प्रक्रिया सुरू ठेवत आहेत हे पाहून बरे वाटले. सरकारमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे फडणवीस एकमेव मंत्री आहेत.”
२०१४ पासून राष्ट्रवादीची भूमिका काय?
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने महायुतीतील अनेक नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, “२०१४ पासून शरद पवार यांच्या पक्षातील नेते सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. त्यांनी २०१४ ते २०१९ आणि २०२२ ते २०२४ मध्ये प्रशासनातील फडणवीसांची भूमिका कधीच मान्य केली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेहमीच फडणवीसांना जबाबदार धरले आणि त्यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेलं कौतुक खरंच आश्चर्याची गोष्ट आहे.”
बदलापूरमधील घटनेनंतर फडणवीसांवर टीका
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. त्यावेळी बदलापूर येथे शाळकरी मुलींवर लैगिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्यांनी फडणवीसांना कसं लक्ष्य केलं होतं याची आठवणही भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी करून दिली. “देवेंद्र फडणवीस हे अर्धवेळ गृहमंत्री असून ते महाराष्ट्राच्या कारभारावर लक्ष देण्याऐवजी दिल्लीत जास्त व्यस्त आहेत”, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता.
भाजपाची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रामाणिकपणा महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. ज्या लोकांनी आमदारकीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास पाहिला आहे, ते लोक त्यांना सर्वात मेहनती आणि प्रामाणिक राजकारणी मानतात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे टीका करणाऱ्या व्यक्तींना त्यांची विश्वासार्हता आणि स्वच्छ प्रतिमेची जाणीव आहे. त्यामुळे विरोधकही हे मान्य करत असल्याचं ऐकून बरं वाटलं. आम्ही त्यांचे स्वागतच करतो”, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. मला गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छाही फडणवीसांनी बोलून दाखवली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्रातून त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली. ‘अभिनंदन देवाभाऊ’ या शीर्षकाखाली ‘सामना’मध्ये अग्रलेख लिहिण्यात आला. “गडचिरोलीला ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी ‘पोलाद सिटी’ ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवं”, असं कौतुक ‘सामना’तून करण्यात आलं.
हेही वाचा : Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?
उद्धव ठाकरेंनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट
शिवसेना ठाकरे गटाकडून अचानक मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात उलट सूलट चर्चांना उधाण आलं. विशेष बाब म्हणजे, नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर आमदारदेखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात समेट होणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पवार कुटुंब एकत्र यायला हवं, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांना पक्षाचे ‘आदरणीय नेते’ म्हटलं आहे. यानंतरच सामनाच्या संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आलं आहे.
भाजपाच्या एका नेत्याने सांगितलं की, “शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही गट विलीन होऊन एकाच पक्षात येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.” शरद पवार यांच्याबरोबर असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, “राजकारणात काहीही होऊ शकतं. निवडणुकीत तुम्ही एकमेकांविरुद्ध लढता. परंतु, त्यानंतर तुम्ही युद्धभूमीत उभं राहू शकत नाहीत. निकाल लागल्यावर, तुम्ही तो स्वीकारता आणि पुढे जातात. विरोधकांनाही सत्ताधारी पक्षाबरोबर सौहार्दपूर्ण संबंध ठेवावे लागतील.”
महाविकास आघाडीचे विघटन होणार?
राष्ट्रवादीच्या नेत्याने असेही म्हटलं की, “खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक स्वागतार्ह आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील कधी कोणाशी वैर ठेवत नाहीत. त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी क्षेत्र किंवा सहकार क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे.” दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे विरोधकांच्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे दोघांनीही सत्ताधाऱ्यांबरोबर जुळवून घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळेल आणि महाविकास आघाडीचे विघटन होण्याची शक्यता आहे.