Maharashtra Political News : महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केल्यानंतर रविवारी (१५ डिसेंबर) नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी ३९ नवनिर्वाचित आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष बाब म्हणजे, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना महायुतीने धक्कातंत्राचा वापर केला. नवीन मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर १२ माजी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवर व रविंद्र चव्हाण यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, या माजी मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आलं नाही, याची काही संभाव्य कारणे समोर आली आहे.

छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, येवला मतदारसंघ)

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखलं जातं. येवला विधानसभा मतदारसंघातून भुजबळ हे तब्बल ७ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. १९९९ पासून त्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या २०१४ ते २०१९ या कार्यकाळात भुजबळ यांना २६ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्यावर मनी लाँड्रिगचे आरोप करण्यात आले होते. राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांपैकी एक असलेले भुजबळ हे महायुतीच्या विजयानंतर मंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?

हेही वाचा : Hasan Mushrif : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले एकमेव मुस्लिम मंत्री हसन मुश्रीफ कोण आहेत?

परंतु, त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीमुळे नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या मंत्रिपदाला विरोध केला. विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात बंडखोर उमेदवार म्हणून पुतण्याला उभं केलं. त्यामुळेच शिवसेनेबरोबर असलेले त्यांचे संबंध बिघडले. भाजपाने स्वबळावर १३२ जागांवर विजय मिळवल्यानंतर भुजबळ यांना तुर्तास मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलं आहे. मंत्रि‍पदासाठी विचार न झाल्याने नव्या सरकारचं प्राधान्यक्रम कशाला असणार हे स्पष्ट झालं आहे. भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण द्यायला कडाडून विरोध केला होता.

सुधीर मुनगंटीवार (भाजपा, बल्लारपूर मतदारसंघ)

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये घेतलं जातं. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून ते ७ वेळा निवडून आलेले आहेत. त्यांनी विविध मंत्रिपदे देखील भूषवली आहेत. संघ परिवारातून उदयास आलेले मुनगंटीवार हे १९९५ पासून भाजपातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांवर काम करीत आहेत. त्यांच्या कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते. लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी सुरुवातीला तिकीट घेण्यास टाळाटाळ केली होती. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांना पक्षांतर्गत संघटनात्मक कामाची मोठी जबाबदारी मिळू शकते असं म्हटलं आहे.

रविंद्र चव्हाण (भाजपा, डोंबिवली मतदारसंघ)

माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली. परंतु, नवीन मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून चव्हाण यांना ओळखलं जातं. तळगाळातील भाजपा नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात रवींद्र यांनी छाप उमटवली आहे. भाजपामधल्या एका प्रवाहाचा शिंदे पितापुत्रांच्या नेतृत्वाला विरोध होता. शिंदे आणि चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेद्वारे सोडवलं. पक्षनिष्ठ असलेले रविंद्र चव्हाण हे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष असू शकतात असे संकेत मिळत आहेत.

विजय कुमार गावित (भाजपा, नंदुरबार मतदारसंघ)

विजय कुमार गावित हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध नेते आहेत. विविध सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. २०१४ मध्ये विजयकुमार गावित यांनी भाजपात प्रवेश केला होता. २०२२ मध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. मात्र, अनेकदा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावित यांनी आपल्या कुटुंबातील चारजणांना उमेदवारी मिळवून दिली. जिल्ह्यातला आपला प्रभाव दाखवण्यासाठी गावित यांनी असं केलं. यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेतील शीर्षस्थ नेते नाराज झाले. पक्षातील एकोपा आणि शिस्त यांना बाधा आणणाऱ्या नेत्यांचा मंत्रि‍पदासाठी विचार केला जाणार नाही, असा इशारा गावित यांना देण्यात आला आहे.

हेही वाचा : महायुतीच्या यशाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या भाजपला शिंदेंचा चाप, मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचेही योगदान

अब्दुल सत्तार (शिवसेना, सिल्लोड मतदारसंघ)

शिवसेनेचे एकमेव मुस्लिम आमदार असलेले अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून आलेले आहेत. राज्यात आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार मंत्री होते. परंतु, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकसंध शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्तारहे सरकारमधून बाहेर पडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सत्तार यांना मंत्रिपद देण्यास भाजपा राजी नव्हतं. कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटनांनी सत्तार यांना लक्ष्य केलं होतं. मतदारसंघात बहुसंख्याकांच्या हिताविरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. भाजपाने निवडणुकीत सत्तार यांच्यासाठी प्रचार केला नाही. तेव्हाच सत्तार यांच्याबद्दल भाजपाची नंतर काय भूमिका असेल ते स्पष्ट झालं.

तानाजी सावंत (शिवसेना, परांडा विधानसभा मतदारसंघ)

सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे २३५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. राज्यभरातील अनेक शैक्षणिक संस्थांचे ते संचालक आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अतिशय वादग्रस्त विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, “मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसावे लागते, पण बाहेर आम्हाला आल्यानंतर उलट्या होतात”. तानाजी सावंत यांच्या कडवट विधानामुळे महायुतीत मोठी धुसफूस निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांचे संबंध ताणले गेले होते. काही नेत्यांनी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. वादग्रस्त विधाने आणि राजकीय सूज्ञतेचा अभाव यामुळेच सावंत यांनी मंत्रिपद गमावले असावे, असा अंदाज काढला जात आहे.

दीपक केसरकर (शिवसेना, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ)

माजी मंत्री दीपक केसरकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी बंड केलं तेव्हा त्या नेत्यांची बाजू मांडण्यात केसरकर यांचा वाटा होता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गद्गार, खोके अशा आक्रमक विधानांना प्रत्युत्तर देत त्यांनी शिंदे गटाची बाजू मांडली होती. पण, शिक्षणमंत्री म्हणून चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने त्यांचा मंत्रि‍पदासाठी तूर्तास विचार झालेला नाही. भाजपा नेते नारायण राणे यांच्याशी दुरावलेले संबंधही कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, आंबेगाव विधानसभा मतदारसंघ)

दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून केली होती. ८ वेळा आमदार राहिलेल्या वळसे-पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष, अर्थमंत्री आणि गृहमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहकारीमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रकृतीत अस्वस्थता असल्याचे कारण देत देऊन शिंदे मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वळसे-पाटील यांनी स्वेच्छेने मंत्रिमंडळातून सामील होण्यास नकार दिला, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

हेही वाचा : मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांची घोषणा

सुरेश खाडे (भाजपा, मिरज विधानसभा मतदारसंघ)

माजी मंत्री सुरेश खाडे हे चारवेळा मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दलित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. महायुती सरकारमध्ये खाडे यांच्याकडे कामगार मंत्रिपदाचा पदभार देण्यात आला होता. परंतु, त्यांच्या कामगिरीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. कदाचित यामुळेच खाडे यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसावं.

संजय बन्सोडे (राष्ट्रवादी काँग्रेस, उदगीर विधानसभा मतदारसंघ)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दलित चेहऱ्यांपैकी एक आणि दोन वेळा आमदार राहिलेले संजय बनसोडे हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री होते. परंतु, नवीन मंत्रिमंडळात त्यांना देखील स्थान देण्यात आलं नाही. कारण, पक्षातील इतर नेते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याने बनसोडे यांना मंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली नाही.

धर्मराव बाबा आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस, आहेरी विधानसभा)

माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. प्रमुख नेते म्हणून आत्राम यांची ओळख आहे. जवळपास तीन दशकांची राजकीय कारकीर्द असूनही आत्राम यांचा प्रभाव गडचिरोली जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे. याच कारणामुळे त्यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळावं नसावं.

अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, अमळनेर मतदारसंघ)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून अनिल पाटील यांना ओळखलं जातं. त्यामुळेच पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं. परंतु, पक्षाच्या रोटेशन पॉलिसीमुळे नवीन मंत्रिमंडळातून अनिल पाटील यांना बाहेर ठेवण्यात आल्याचं कळतंय.

Story img Loader