Uddhav Thackeray BJP News : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची २५ वर्षांची युती तुटली. मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत न झाल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तास्थानी आली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत उभी फूट पडल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपाला सातत्याने लक्ष्य केलं आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातूनही भाजपावर अनेकदा टीका करण्यात आली. मात्र, ५ वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे आणि त्यामुळेच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?

Sudhir Mungantiwar and Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून वगळलं का? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
ujjwal nikam on beed sarpanch murder
Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा युक्तिवाद उज्ज्वल निकम करणार; लोकसभेच्या पराभवानंतर निकम पुन्हा चर्चेत कसे आले?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
jitendra Awhad Mahesh Vighne Walmik karad
Jitendra Awhad: ‘चौकशी करणारेच वाल्मिक कराडचे मित्र’, PSI बरोबरचे फोटो पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचे तपासावरच प्रश्नचिन्ह
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. गडचिरोली जिल्ह्यात लवकरच नवीन एअरपोर्ट होईल आणि त्याचबरोबर जलवाहतूक करता येईल का, त्यासाठीचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली. गडचिरोली जिल्ह्याचं पालमंत्री व्हायला आवडेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली.

‘अभिनंदन देवाभाऊ’ या शीर्षकाखाली ठाकरे गटाच्या ‘सामना’मध्ये अग्रलेख लिहिण्यात आला. “बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस हे कौतुकास पात्र आहेत, अशी स्तुतीसुमनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळण्यात आली. त्याचबरोबर ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’ ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

ठाकरेंनी घेतली होती, फडणवीसांची भेट

विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर आमदारदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा देखील महाराष्ट्रात सुरू झाली आहे.

ठाकरेंनी भाजपावर केले होते गंभीर आरोप

याआधी उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून भाजपावर जहरी टीका करत होते. त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखातूनही भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले होते. उद्धव त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचून शिवसेनेत फूट पाडण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाचे नेते करत होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुखपदाची धुरा सांभाळली. परंतु, एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्यावर वरचढ ठरली.

हेही वाचा : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, सामनाचे संपादक आणि शिवसेना (ठाकरे गट) राज्यसभा खासदार संजय राऊत माध्यमांबरोबर संवाद साधताना म्हणाले की, “दैनिक सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिहिण्यात आलं आणि त्यांचे अभिनंदन करण्यात आलं. कारण, देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांनी तिथे चांगली विकासकामे सुरू केली आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांचे कौतुक केले आहे. यात जवळीक साधण्याचा प्रश्नच येत नाही. पालकमंत्री हे महाराष्ट्रातील कॅबिनेट स्तरावरील पद आहे. ज्याअंतर्गत जिल्ह्यांमध्ये विशिष्ट विकासकामांची देखरेख केली जाते.”

संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंवर आरोप

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी चांगली विकासकामं केली आहेत. त्यामुळेच ते कौतुकास पात्र आहेत. आम्ही नक्कीच विरोधी पक्षात आहोत, पण गडचिरोलीसारख्या नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून संविधानाचा मार्ग स्वीकारला तर आम्ही त्यांचे स्वागत करू… जिल्ह्याचे माजी पालकमंत्री (एकनाथ शिंदे) असे काम करू शकले असते. परंतु, त्याऐवजी त्यांनी स्वतःचे एजंट नेमले आणि पैसे गोळा केले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा उदय झाला”, असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला. “देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आम्ही यापूर्वी काम केलं आहे. आमचे नाते कायम आहे”, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया काय?

सामनाच्या अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करण्यात आल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांचे आभारही मानले. माध्यमांबरोबर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस असून आम्ही याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. याआधी देखील देवेंद्र फडणवीस यांनी चांगली कामे केली आहेत, पण सामना वर्तमानपत्राने त्यांची दखल घेतली नव्हती. विकसित महाराष्ट्राकडे आम्ही राज्याला घेऊन जात आहोत याचा मला आनंद आहे”.

भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, “शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणं हे नक्कीच चांगल्या घडामोडींचे संकेत आहेत. याआधी देखील उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेऊन हस्तांदोलन केलं होतं. आता सामनाच्या अग्रलेखातून त्यांचे कौतुक करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांचे संबंध नक्कीच सुधारतील.”

हेही वाचा : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले?

उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जाणार का?

शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाकडून कार्यकर्त्यांना उघड संदेश देऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका सूत्राने सांगितले की, “शिवसेना ठाकरे गटात सध्या प्रचंड असंतोष असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे जायला हवं, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. भाजपाबरोबर असे संकेत देत नाराज कार्यकर्त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.” विशेष बाब म्हणजे, शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतरच शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीचे विघटन होणार?

बुधवारी अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी देखील पवार कुटुंब एकत्र यायला हवं, अशी इच्छा बोलून दाखवली होती. दोन्ही गटातील नेत्यांनी त्यांच्या इच्छेवर सहमती दर्शवली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवार यांचे प्रमुख सहकारी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना पक्षाचे ‘आदरणीय नेते’ म्हटलं आहे. सध्या शरद पवार यांचा पक्ष विरोधकांच्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आहे. त्यांनी जर अजित पवार यांच्या पक्षात स्वत:च्या पक्षाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचे विघटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांची मनं जुळण्याआधी उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जवळीक वाढवण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना?असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Story img Loader