Maharashtra Elections Buldhana Congress Free : जिल्ह्यात महायुतीने सातपैकी सहा जागा जिंकून आपला दबदबा निर्माण केला आहे. यातही मोठा भाऊ ठरलेल्या भाजपने चार जागा जिंकल्या असून जिल्हा काँग्रेसमुक्त करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढतीची मशागत केली आहे. भाजपकृत ‘हरियाणा पॅटर्न’मुळे बुलढाणा जिल्ह्यात महायुतीने घवघवीत यश मिळवल्याचे चित्र आहे.

हिंदुत्वाला अनुकूल मतदारसंघाची निवड, ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेले उमेदवार, त्यांना उमेदवारीसंदर्भात खूप पूर्वी दिलेली कल्पना, आघाडीला घातक ठरू शकणाऱ्या मोठ्या संख्येतील अपक्षांची ‘पेरणी’, संभाव्य मतविभाजनाचे नियोजन, जाहीर सभा आणि प्रचाराचे सुसज्ज नियोजन हे घटक भाजपसाठीच नव्हे तर मित्रपक्षांनाही उपयुक्त ठरले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेला प्रभावी छुपा प्रचार आणि उमेदवारांना दिलेल्या उपयुक्त सूचना महत्त्वाच्या ठरल्या. केवळ भाजपच्या वाट्यावरील चिखली, जळगाव, मलकापूर, खामगावच नव्हे तर संघाने मित्रपक्षांच्या मतदारसंघातदेखील मतदानाचे सूक्ष्म नियोजन केले. चिखलीमध्ये ‘अँटिइन्कम्बन्सी’चा प्रभाव जास्त जाणवल्याने उमेदवाराला स्पष्ट जाणीव करून देत सावध करतानाच डागडुजी करण्यात आली.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

हेही वाचा – भिवंडी पश्चिमेत पुन्हा मत विभाजनाचा भाजपला फायदा

मलकापूरमध्ये भाकरी फिरवण्याच्या बेतात असलेल्या भाजपने ऐनवेळी जुनेजानते चैनसुख संचेती यांना सहाव्यांदा उमेदवारी दिली. तिथे विकासाशिवाय अन्य मुद्दे नसल्याने हिंदुत्वाचा नारा देण्यात आला. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात आले. प्रचाराच्या प्रारंभीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जंगी सभेने आणि त्यांच्या जहाल, अल्पसंख्याकविरोधी भाषणाने ध्रुवीकरणाची पायाभरणी झाली. ‘ये भगवा रंग फेम गायिका शहनाज अख्तर यांच्या गायनाचा कार्यक्रम आणि त्याला उसळलेल्या गर्दीने मतांची इमारत उभी राहिली. वादग्रस्त अभिनेत्री खासदार कंगना रनावत यांच्या मलकापूर आणि नांदुरामधील ‘रोड शो’ मुळे भगवा माहौल निर्माण झाला. संचेती यांनी काँग्रेस उमेदवार आमदार राजेश एकडे यांच्या विकासकामांना लक्ष्य केले. वंचित आणि अन्य अपक्षांनी घेतलेल्या मतांनी विभाजनाचे काम चोख बजावले. यामुळे विजयाची खात्री नसलेल्या भाजपने ही जागा २६ हजारांच्या फरकाने जिंकली.

जळगावमध्ये आमदार संजय कुटे आणि खामगावमध्ये आमदार आकाश फुंडकर एकतर्फी जिंकले. मात्र, दोन्ही ठिकाणी ‘हरियाणा पॅटर्न’ निकालात निर्णायक ठरला. खामगावात २६ हजारांवर आणि जळगावमध्ये १९ हजारांच्या आसपास मते घेत वंचितने भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. चिखलीमध्ये बिकट स्थितीत ३२०१ मतांनी विजय मिळवीत श्वेता महाले सलग दुसऱ्यांदा आमदार झाल्या. या तिघांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आणि अतिरिक्त मतांसाठी केलेल्या ‘सोशल इंजिनिअरिंग’चा भाजपला फायदा झाला. मलकापूरमधे हे नसल्याने हिंदू ध्रुवीकरणचे यशस्वी डावपेच खेळण्यात आले.

‘पंजा’ गायब अन् अजितदादांची सरशी!

भाजपने राज्याप्रमाणेच बुलढाण्यातही काँग्रेससोबत सामना करण्याचे धोरण ठेवत शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, असा लढा निश्चित केला. ‘हरियाणा पॅटर्न’च्या धर्तीवर लढणाऱ्या भाजपचा सामना करताना काँग्रेस पारंपरिक ‘पॅटर्न’नेच लढली. याशिवाय त्यांना विजयाचा अतिआत्मविश्वास, गटबाजी, कमकुवत मित्रपक्षांची साथ, मतविभाजन भोवले. चांगली मते घेऊनही मलकापूर, खामगाव, जळगाव आणि चिखली या चारही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे प्रबळ पक्षाचा सफाया करण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी झाले. यापरिणामी जिल्हाध्यक्ष
राहुल बोन्द्रे, माजी आमदार दिलीप सानंदा, राजेश एकडे आणि स्वाती वाकेकर यांचे राजकारण धोक्यात आले आहे.

काँग्रेसचा सफाया करतानाच धूर्त भाजपने सिंदखेडराजामधील शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या मित्रपक्षांतील मैत्रीपूर्ण लढतीकडे दुर्लक्ष करून मध्यस्थी करण्याचे टाळले. भाजपचा पाठींबा कुणाला, हे गुलदस्यातच ठेवले. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिष्ठेची बाब करीत शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर यांच्यासाठी सभा घेतली. मात्र यात नवखे असलेले अजितदादा गटाचे मनोज कायंदे हे विजय खेचून आणत शरद पवार गटाचे दिग्गज नेते राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार खेडेकर यांचा पराभव करून ‘जायंट किलर’ ठरले. दुसरीकडे, राष्ट्रवादी कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अजितदादांची असे निकालातून मिळाले.

सेना फिफ्टी फिफ्टी

शिंदे गटाने बुलढाण्यात तर ठाकरे गटाने मेहकरमध्ये विजय मिळवीत पक्षाची इभ्रत आणि अस्तित्व राखले. मेहकरमध्ये ठाकरे गटाचे नवखे सिद्धार्थ खरात हे शिंदे गटाचे आमदार संजय रायमूलकर यांना पराजित करीत ‘जायंट किलर’ ठरले. राजकारणात नवीन असूनही आत्मविश्वास, सुनियोजित प्रचार या बळावर खरात यांनी बाजी मारली. याउलट विजयाचा अतिआत्मविश्वास, स्वकीयांनी केलेला घात यामुळे रायमूलकर यांना हार मानावी लागली.

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात राजकीय सूडचक्राचा अंत की सुरुवात?

प्रचारापासून मतदान आणि मतमोजणीपर्यंत काट्याची दुरंगी लढत ठरलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा ८४१ मतांनी पराभव करीत विजयश्री अक्षरशः खेचून आणली! वंचित आणि अपक्षांनी घेतलेल्या मतदानामुळे झालेले धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन आणि नामसाध्यर्म असलेल्या जयश्री रवींद्र शेळके (६३८ मते) या उमेदवाराने घेतलेली मते याचा ठाकरे गटाला फटका बसला. यामुळे अटीतटीची लढत, झुंज देऊनही तीन आकडी फरकाने झालेला पराभाव जयश्री शेळके यांच्यासाठी न भरून निघणारी राजकीय जखम ठरली. येथे ‘नोटा’ ला तब्बल १६६० मते मिळाली.

Story img Loader