नागपूर : लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कडवे आव्हान देणारे विकास ठाकरे यांना काँग्रेसने पुन्हा एकदा पश्चिम नागपूर मतदारसंघाच्या मैदानात उतरले असून त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस बंडखोरही रिंगणात असल्याने काँग्रेसपुढे हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान आहे.

विकास ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली कामे आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेली प्रश्नांची जाण ही त्यांची सकारात्मक बाजू ठरत आहे. शिवाय त्यांचा जनसंपर्कात  सातत्य आहे. त्याचा त्यांना लाभ होताना दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी पश्चिम नागपुरात रोड-शो केल्यानंतर वातावरण आणखी ठाकरेंना बाजूने तयार झाल्याचे दिसून येत आहे.

Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
accused absconded from Ajani police station
नागपूर : आजनी पोलीस ठाण्यातून आरोपी पसार

हेही वाचा >>>अकोला जिल्ह्यात तिरंगी सामने; महायुती, महाविकास आघाडीसह वंचित लढतीत

 सिव्हिल लाईन्स सारखा विकसित आणि बोरगाव, दाभा, धापेवाडा सारख्या नव्याने विकसित होत असलेला भाग या मतदारसंघात आहे. तसेच फुटाळा आणि पांढराबोडी सारखा ‘स्लम एरिया’ देखील आहे. याबरोबरच येथे हिंदी भाषक आणि मुस्लीमांची संख्या निर्णायक आहे. साधारणत: हिंदी भाषक मतदारांचा भाजपकडे कल आणि मुस्लीम समाज काँग्रेसच्या बाजूने कौल देतील, असे काही निडवणुकीवरून अंदाज बांधला जात आहे. यावरून  या मतदासंघात विकास ठाकरे आणि सुधाकर कोहळे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. तर अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांनी अतिशय नेटाने प्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या प्रमुख दोन पक्षाच्या थेट लढत आणखी रंगतदार झाली आहे. येथे मुस्लीम समाजाची ११ ते १२ टक्के मते असल्याचा लाभ ठाकरेंना होईल असे दिसून येत आहे.

हेही वाचा >>>लक्षवेधी लढत : काँग्रेसमधील बंडाळीचा भाजपला फायदा?

प्रियंका गांधी यांच्या रोड-शोमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिलांना रस्त्याच्या दुतर्फा उभे असल्याचे चित्र होते. तर अनुसूचित जातीचे २० ते २१ टक्के मतदार असून या मतांवर देखील ठाकरे यांची मदार आहे. हे ओळखून येथे बसपचे प्रकाश गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीचे यश गौरखेडे देखील मैदानात उतरले आहे. असे असलेतरी लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कौल बघता ठाकरे यांचे पारडे जड दिसून येत आहे.