अकोला : विधानसभेच्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये तिरंगी सामन्यांची चुरस आहे. महायुती, महाविकास आघाडीसह वंचितदेखील लढतीत दिसून येते. जातीय समीकरण व मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

अकोला जिल्ह्यात २०१९ मध्ये पाचपैकी चार ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी युतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची जागा निवडून आली होती. पाच वर्षांमध्ये राजकीय समीकरणात बदल झाले. जिल्ह्यातील वर्चस्व कायम राखण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. सलग २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकणाऱ्या अकोला पश्चिम मतदारसंघात यावेळेस भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण व वंचित समर्थित अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांच्यात काट्याची लढत होत आहे. या मतदारसंघात निवडणुकीला धार्मिक रंग चढले.

yogi Adityanath told mahavikas aghadi problem
काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
Assembly Election 2024 Achalpur Constituency Bachu Kadu Mahavikas Aghadi and Mahayuti print politics news
लक्षवेधी लढत: अचलपूर : बच्चू कडूंसमोर चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान
Chief Minister of Uttar Pradesh and BJP leader Yogi Adityanath criticized Mahavikas Aghadi in vashim
“विरोधकांच्या महा‘अडाणी’ आघाडीला देश व धर्माची…” वाशीममध्ये कडाडले योगी आदित्यनाथ

शहर व ग्रामीण भाग जोडलेल्या अकोला पूर्वमध्ये १० वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांच्यासाठी कोट्यवधींचे विकास कामे, पक्षाचे मजबूत जाळे व तळागाळातील जनसंपर्क जमेची बाजू ठरू शकते. शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर व वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अकोला पूर्व मतदारसंघात जातीय राजकारण देखील महत्त्वपूर्ण ठरेल. मूर्तिजापूर मतदारसंघात नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या टप्प्यात हरीश पिंपळे यांना उमेदवारी मिळाली. या मतदारसंघात भाजप, वंचितचे डॉ. सुगत वाघमारे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांच्यात सामना आहे. अकोट मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महेश गणगणे, भाजपचे प्रकाश भारसाकळे यांच्यात लढत आहे. बाळापूर मतदारसंघात वंचित आघाडीचे नातिकोद्दिन खतीब, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बळीराम सिरस्कार व शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी केल्याने मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होईल. त्याचा फटका मविआसह महायुतीला देखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोला जिल्हा वंचित आघाडीचे प्रभाव क्षेत्र आहे. त्यामुळे पाचही मतदारसंघात ‘वंचित फॅक्टर’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हे ही वाचा… सिंदखेडराजाच्या आखाड्यात दोन मित्र समोरासमोर, ‘शत्रू’चेही आव्हान

हे ही वाचा… २७ मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढतींचे ‘मविआ’समोर आव्हान

दिग्गज नेत्यांनी प्रचार मैदान गाजवले

पाचही मतदारसंघांमध्ये भाजपने आक्रमक प्रचार करून विकासाचे मुद्दे मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभा झाल्या. काँग्रेसचे अकोटचे उमेदवार ॲड. महेश गणगणे व अकोला पश्चिमचे साजिद खान पठाण यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार इमरात प्रतापगढी यांनी प्रचार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बाळापूरमध्ये सभा घेतली. वंचितच्या प्रचाराची धुरा ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्यावर होती. दिग्गज नेत्यांनी प्रचार मैदान गाजवले आहे.