अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेनंतर राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.’वंचित’ने भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे वंचितचे गठ्ठा मतदान अपक्ष उमेदवाराकडे वळण्याची शक्यता असून मतदारसंघातील गणित बदलणार आहेत.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा तब्बल सहा वेळा सलग निवडून आले. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाल्यामुळे वर्षभरापासून ही जागा रिक्त आहे. दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या पश्चात ती परंपरा कायम राखण्याचे भाजपपुढे डोंगरा एवढे आव्हान आहे. स्व.शर्मा यांच्या राजकीय उत्तराधिकाऱ्याचा कळीचा मुद्दा होता. अकोला पश्चिममधून लढण्यासाठी स्व.गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा यांच्यासह २२ जण इच्छूक होते. पक्षाने शर्मा कुटुंबाला उमेदवारी नाकारून माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांना उमेदवारी जाहीर होताच पक्षात मोठी बंडखोरी झाली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे प्रहारकडून, तर माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष म्हणून दंड थोपाटले. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा देखील अपक्ष निवडणूक लढत आहेत. यासर्व उमेदवारांच्या बंडखोरीमुळे हिंदुत्ववादी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार असल्याचे स्पष्ट आहे.

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Chhagan Bhujbal on Rajdeep Sardesai book
Chhagan Bhujbal: ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपाशी हातमिळवणी’, पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले…
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले
Deepak Kesarkar challenge increased due to rebellion from BJP
लक्षवेधी लढत: सावंतवाडी : बंडखोरीमुळे केसरकरांच्या आव्हानात वाढ

आणखी वाचा-गेवराईत नात्या-गोत्यांमध्येच प्रमुख लढत

२०१९ मध्ये भाजपला कडवी झुंज देणारे काँग्रेसचे साजिद खान पठाण पुन्हा एकदा मैदानात आहेत. दरम्यान, काँग्रेसने अकोला पश्चिममध्ये मोठा डाव टाकून मत विभाजन टाळण्यासाठी वंचितला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन यांनी वंचितच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल करून अखेर माघार घेतली. वंचित आघाडीसह भाजपसाठी देखील हा मोठा धक्का होता. त्यानंतर वंचित काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर आज वंचित आघाडीने भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. दलितांचे गठ्ठा मतदान परंपरागत वंचितचे समजल्या जाते. या मतदारसंघात वंचितची सुमारे २० ते २५ हजारांची मतपेढी असल्याचे गेल्या काही निवडणुकांवरील पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवरून लक्षात येते. वंचितच्या अधिकृत पाठिंब्यामुळे आता ते मतदान अपक्ष उमेदवाराकडे वळण्याची शक्यता आहे. वंचितच्या भूमिकेमुळे अकोला पश्चिममधील लढतीत आणखी रंगत वाढली आहे.

आणखी वाचा-महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे

फटका भाजपला की काँग्रेसला?

वंचितने भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना पाठिंबा देऊन काँग्रेस व भाजपाला अडचणीत टाकल्याचे दिसून येते. वंचितने तटस्थ भूमिका घेतली असती, तर त्यांचे परंपरागत मतदान काँग्रेसकडे वळण्याची अधिक शक्यता होती. वंचितची भूमिका भाजपसाठी पोषक व घातक अशी दुहेरी ठरली आहे. त्यांचे परंपरागत मतदान काँग्रेसकडे जाणार नाही या दृष्टीने भाजपसाठी अनुकूल, तर वंचितच्या पाठिंबामुळे बंडखोर उमेदवाराला फायदा होणार असल्याने दुसरीकडे डोकेदुखीची देखील ठरणार आहे.