Amravati Vidhan Sabha Election 2024 : भाजपसमोर मतांची टक्‍केवारी वाढविण्‍याचे आव्‍हान

BJP in Amravati Assembly Constituency : भाजपने यावेळी पाच जागांवर डाव खेळलेला असताना गत निवडणुकीपेक्षा मतांची टक्‍केवारी वाढविण्‍याचे आव्‍हान भाजपसमोर आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 BJP in Amaravati district assembly 2024 and election 2019 results updates
केवळ धामणगाव रेल्‍वे या एकमेव मतदारसंघातून भाजपला यश प्राप्‍त झाले होते.(प्रतिकात्मक छायाचित्र)

Amravati Assembly Constituency 2024- अमरावती : गेल्‍या निवडणुकीत भाजपला जिल्‍ह्यात केवळ एका जागेवर विजय मिळवता आला, हे शल्‍य बाळगत भाजपने यावेळी पाच जागांवर डाव खेळलेला असताना गत निवडणुकीपेक्षा मतांची टक्‍केवारी वाढविण्‍याचे आव्‍हान भाजपसमोर आहे.

गेल्‍या वेळी देखील भाजपने पाच जागांवर उमेदवार उभे केले होते. केवळ धामणगाव रेल्‍वे या एकमेव मतदारसंघातून भाजपला यश प्राप्‍त झाले होते. भाजपचे प्रताप अडसड यांना ४३.२९ टक्‍के मते मिळाली होती. मोर्शी मतदारसंघातून भाजपचे डॉ. अनिल बोंडे हे ४४.९९ टक्‍के मते मिळवूनही पराभूत झाले होते. अमरावती मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुनील देशमुख ( ३७.२१ टक्‍के मते), दर्यापूरमधून रमेश बुंदिले ( ३४.३४ टक्‍के मते), आणि मेळघाटमधून भाजपचे रमेश मावस्‍कर (२३.७५ टक्‍के मते) यांना पराभवाचा धक्‍का बसला होता.

Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Manoj Jarange Patil in Assembly Election
Manoj Jarange Patil in Assembly Election : मनोज जरांगे यांच्या निर्णयाने उमेदवार नाराज
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange Patil Withdrew from the Maharashtra Assembly Election 2024
Manoj Jarange Patil in Assembly Election: मनोज जरांगे यांचे पुन्हा ‘ पाडापाडी’ चे प्रारुप
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

आणखी वाचा-मनोज जरांगे यांचे पुन्हा ‘ पाडापाडी’ चे प्रारुप

गेल्‍या पाच वर्षांमध्‍ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्‍यावेळी भाजप-शिवसेना युती होती. आता शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्‍ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत भाजप महायुतीच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यातील काँग्रेसचे वर्चस्‍व मोडून काढण्‍याच्‍या तयारीने मैदानात उतरला असला, तरी विजय आणि पराजय यातील मतांची दरी भरून कशी निघणार याची चिंता भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना आहे.

भाजपने यावेळी धामणगाव रेल्‍वे, अचलपूर, मेळघाट, तिवसा आणि मोर्शी या पाच मतदारसंघांमध्‍ये पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. मोर्शीत तर राष्‍ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि भाजप समोरा-समोर आहे महायुतीत दर्यापूरची जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला, अमरावतीची जागा राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळाली आहे, तर बडनेरात भाजपने युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांना पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा-Jat Vidhan Sabha Constituency: जतमध्ये स्थानिक विरुद्ध उपरा प्रचार भाजपसाठी तापदायक

गेल्‍या काही वर्षांत भाजपने पक्षसंघटनात्‍मक बांधणीकडे विशेष लक्ष दिले. त्‍यामुळे कार्यकर्त्‍यांची महत्‍वाकांक्षा उफाळून आली. त्‍यामुळे सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्‍येच दिसली. हिंदुत्‍वाच्‍या मुद्यावर भर देत लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्‍या भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांना धक्‍कादायक पराभव पत्‍करावा लागला. या पराभवाचे शल्‍य अजूनही राणा यांच्‍या गटाला आहे. नवनीत राणा यांनी भाजपमध्‍ये आपले स्‍थान भक्‍कम करीत स्‍टार प्रचारकांमध्‍ये स्‍थान मिळवलेच शिवाय उमेदवारांच्‍या निवडीतही आपले वजन वापरल्‍याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून तब्‍बल २६ हजार ७६३ आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ५९५ इतके मताधिक्‍य मिळाले होते. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे बडनेराचे आमदार आहेत आणि आता युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत. दोनच मतदारसंघांतून नवनीत राणा यांना मताधिक्‍य मिळू शकले, इतर चारही मतदारसंघांमध्‍ये त्‍या पिछाडीवर राहिल्‍या. हिंदू मतांच्‍या ध्रुवीकरणावर भाजपचा भर आहे. मेळघाट, तिवसा, अचलपूर या मतदारसंघांमध्‍ये भाजपला मताधिक्‍य मिळवून देणे हे नवनीत राणा यांच्‍यासमोर आव्‍हान आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 bjp in amaravati district assembly 2024 and election 2019 results updates print politics news mrj

First published on: 04-11-2024 at 13:12 IST

संबंधित बातम्या