Amravati Assembly Constituency 2024- अमरावती : गेल्या निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात केवळ एका जागेवर विजय मिळवता आला, हे शल्य बाळगत भाजपने यावेळी पाच जागांवर डाव खेळलेला असताना गत निवडणुकीपेक्षा मतांची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या वेळी देखील भाजपने पाच जागांवर उमेदवार उभे केले होते. केवळ धामणगाव रेल्वे या एकमेव मतदारसंघातून भाजपला यश प्राप्त झाले होते. भाजपचे प्रताप अडसड यांना ४३.२९ टक्के मते मिळाली होती. मोर्शी मतदारसंघातून भाजपचे डॉ. अनिल बोंडे हे ४४.९९ टक्के मते मिळवूनही पराभूत झाले होते. अमरावती मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुनील देशमुख ( ३७.२१ टक्के मते), दर्यापूरमधून रमेश बुंदिले ( ३४.३४ टक्के मते), आणि मेळघाटमधून भाजपचे रमेश मावस्कर (२३.७५ टक्के मते) यांना पराभवाचा धक्का बसला होता.
आणखी वाचा-मनोज जरांगे यांचे पुन्हा ‘ पाडापाडी’ चे प्रारुप
गेल्या पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्यावेळी भाजप-शिवसेना युती होती. आता शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत भाजप महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्याच्या तयारीने मैदानात उतरला असला, तरी विजय आणि पराजय यातील मतांची दरी भरून कशी निघणार याची चिंता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे.
भाजपने यावेळी धामणगाव रेल्वे, अचलपूर, मेळघाट, तिवसा आणि मोर्शी या पाच मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. मोर्शीत तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि भाजप समोरा-समोर आहे महायुतीत दर्यापूरची जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला, अमरावतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळाली आहे, तर बडनेरात भाजपने युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांना पाठिंबा दिला आहे.
आणखी वाचा-Jat Vidhan Sabha Constituency: जतमध्ये स्थानिक विरुद्ध उपरा प्रचार भाजपसाठी तापदायक
गेल्या काही वर्षांत भाजपने पक्षसंघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांची महत्वाकांक्षा उफाळून आली. त्यामुळे सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्येच दिसली. हिंदुत्वाच्या मुद्यावर भर देत लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे शल्य अजूनही राणा यांच्या गटाला आहे. नवनीत राणा यांनी भाजपमध्ये आपले स्थान भक्कम करीत स्टार प्रचारकांमध्ये स्थान मिळवलेच शिवाय उमेदवारांच्या निवडीतही आपले वजन वापरल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून तब्बल २६ हजार ७६३ आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ५९५ इतके मताधिक्य मिळाले होते. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे बडनेराचे आमदार आहेत आणि आता युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत. दोनच मतदारसंघांतून नवनीत राणा यांना मताधिक्य मिळू शकले, इतर चारही मतदारसंघांमध्ये त्या पिछाडीवर राहिल्या. हिंदू मतांच्या ध्रुवीकरणावर भाजपचा भर आहे. मेळघाट, तिवसा, अचलपूर या मतदारसंघांमध्ये भाजपला मताधिक्य मिळवून देणे हे नवनीत राणा यांच्यासमोर आव्हान आहे.