अकोला : बंडखोरींची मनधरणी करण्यात भाजप नेतृत्वाला अद्यापही यश आलेले नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बंडोबांची समजूत घातली जात आहे. काही ठिकाणी विशेष दूत पाठवण्यात आले. अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपला मतविभाजनाचा मोठा धोका असल्याने माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी माघार घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. हरीश् आलिमचंदानी यांच्या भूमिकेवर अकोला पश्चिमचे भवितव्य ठरणार आहे. रिसोड मतदारसंघात भाजपचे अनंतराव देशमुख यांनी हातात घेतलेल्या बंडाच्या झेंड्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला. बंडोबा अंतिम क्षणी काय निर्णय घेतात, यावर मतदारसंघांमधील राजकीय समीकरण निश्चित होईल.

अकोला व वाशीम जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी बुहतांश ठिकाणी महायुती व मविआला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक लक्ष अकोला पश्चिम व रिसोड मतदारसंघातील बंडखोरीकडे लागले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढत आहेत. ते माघार घेण्याची शक्यता दिसत नाही. भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष म्हणून दंड थोपाटले. यशस्वी व्यापारी, उद्योजक व सिंधी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास भाजपच्या हिंदुत्ववादी परंपरागत मतपेढीत मोठा खड्डा पडू शकतो.

Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
maharashtra vidhan sabha election 2024 shinde shiv sena vs ajit pawar ncp in sindkhed raja assembly constituency
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सिंदखेडराजात ‘मित्रांची’ लढत अटळ
In Bhosari assembly former corporator Ravi Landge supported NCP candidate Ajit Gavane
भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा >>> Ambernath Assembly Constituency : अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांच्या अडचणीत वाढ

मतदारांनाकडून त्यांना प्रतिसाद मिळत असून उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे आलिमचंदानी यांचे बंड शमवण्याचे पक्षाकडून पुरेपूर प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आलिमचंदानी यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थी करण्यासाठी विक्की कुकरेजा यांना नागपूरवरून पाठविण्यात आले. अन्याय होऊ देणार नाही, योग्य संधी देऊ, असा शब्द दिला. मात्र, त्यावर आलिमचंदानी मान्य झाले नाही. पक्षाने दिलेल्या उमेदाराविरोधात तीव्र नाराजी आहे. त्यांना माघार घ्यायला लावून नव्याने इतरत्र संधी द्यावी, अकोला पश्चिममधून पक्षाचे समर्थित उमेदवार म्हणून कायम राहू द्यावे, अशी भूमिका हरीश आलिमचंदानी यांनी पक्षनेतृत्वाकडे मांडल्याची माहिती आहे. आता पक्ष व आलिमचंदानी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची? हे ४९ मतदारसंघ ठरविणार दोन्ही गटांचे भवितव्य

वाशीम जिल्ह्यातील रिसाेड मतदारसंघात सर्वात मोठे बंड झाले. गेल्यावेळेस काँग्रेसच्या अमित झनक यांना काट्याची लढत देणारे माजी मंत्री अनंतराव देशमुख पुन्हा एकदा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजपकडून संधी मिळण्याच्या आशेवर त्यांनी पक्ष प्रवेश केला होता. हा मतदारसंघ शिवसेनेने घेऊन भावना गवळी यांना संधी दिली. त्यामुळे अपक्ष राहण्याची भूमिका अनंतराव देशमुखांची घेतली. त्यांच्या उमेदवारीचा मोठा फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने वेगळी भूमिका घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाले आहेत. अनंतराव देशमुखांची मनधरणी केली जात असली तरी त्यात कितपत यश येते, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

बंडखोरी मविआमध्ये, अडचण भाजपची

अकोला पश्चिम मतदारसंघात ‘मविआ’मध्ये देखील बंडखोरी झाली. शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरी ‘मविआ’मध्ये झाली असली तरी जुने शहरातील हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनामुळे अडचण भाजपची होणार आहे. त्यामुळे राजेश मिश्रांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

Story img Loader