बुलढाणा: सोमवारी उमेदवारांच्या माघारीचे नाट्य संपल्यावर जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील लढतीचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. सातही मतदारसंघात मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगण्याची चिन्हे आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणूक संग्रामात मागील लढतीतील कामगिरी चे सातत्य राखण्याचे आव्हान महायुतीसमोर असून महाविकास आघाडीला कामगिरी सुधारण्याचे कडवे आव्हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील २०१९ च्या लढतीत युतीने एकतर्फी बाजी मारली. भाजपने जळगाव जामोद ( संजय कुटे), खामगाव (आकाश फुंडकर) आणि चिखली ( श्वेता महाले) या तीन मतदारसंघात विजय मिळाला होता तर काँग्रेसला केवळ मलकापूरची जागा मिळाली होती. येथे राजेश एकडे भाजपचे दिग्गज नेते चैनसुख संचेती यांना पराभूत करून ‘जायंट किलर’ ठरले. सिंदखेड राजा मतदारसंघात एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला. लोकसभेत युतीचे सहा तर आघाडीचा एकच आमदार असे चित्र निर्माण झाले होते. आता त्यातील राजेंद्र शिंगणे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात अर्थात आघाडीत परतले.

आणखी वाचा-Yavatmal Vidhan Sabha Constituency : यवतमाळात महाविकास आघाडीला दिलासा, संदीप बाजोरीया यांची माघार

नेत्यांची अग्निपरीक्षा

या पार्श्वभूमीवर यंदाची लढत युती आणि आघाडीची अग्निपरीक्षा घेणारी ठरली आहे. महायुती समोर, आपली मागील लढतीतील कामगिरी कायम ठेवण्याचे आव्हान आहे. यावेळी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसने कोणताही ‘प्रयोग’ करण्याचे टाळले. भाजप आणि शिंदे गटाने आपल्या पाचही आमदारांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. मलकापूर मध्ये भाजपने चैनसुख संचेती यांनाच संधी दिली.

शरद पवारांनी ‘चुकभुल माफ’ करून राजेंद्र शिंगणेंनाच मैदानात उतरविले. यंदा केवळ ठाकरे गटाने निष्ठेचा भावनाशील मुद्दा बाजूला करीत ‘इलेक्टिव्ह मेरिट’या निकषावर बुलढाण्यात, एकाच वेळी पक्षप्रवेश आणि ‘एबी फॉर्म’ देत मुळच्या काँग्रेसी जयश्री शेळके यांना तर मेहकर मध्ये सिद्धार्थ खरात यांना संधी दिली.

आणखी वाचा-निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?

अनुभवी नेत्यांचा भरणा

दरम्यान शिंगणे, संजय रायमूलकर चौथ्यांदा, आकाश फुंडकर तिसऱ्यांदा, संजय कुटे पाचव्यांदा मैदानात उतरले आहे. श्वेता महाले, संजय गायकवाड आणि राजेश एकडे दुसऱ्यांदा मैदानात आहे. या तुलनेत ठाकरे गटाच्या जयश्री शेळके व मंत्रालयातून सह सचिव पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेणारे सिद्धार्थ खरात हे प्रथमच रिंगणात आहे. काँग्रेसने अनुभवी माजी आमदार राहुल बोन्द्रे (चिखली) आणि दिलीप सानंदा (खामगाव)तर जळगाव} मधून दुसऱ्यांदा स्वाती वाकेकर यांनाच संधी दिली.

या सर्व उमेदवारांसमोर वेगवेगळी आव्हाने असून त्यांना विजयापर्यंत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तसेच भाजप समोर तीन जागा कायम ठेवून मलकापूर मध्येही विजय मिळविण्याचे आव्हान आहे.