बुलढाणा जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत थेट सामना असून सिंदखेडराजातील मैत्रीपूर्ण लढत लक्षवेधी ठरली आहे. वंचित, बसप, मोठ्या संख्येतील नवीन पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेहकर आणि बुलढाणा मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगतदार ठरणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मेहकरमध्ये चौथ्यांदा आमदारकी मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या शिंदे सेनेच्या संजय रायमूलकर यांच्यापुढे ठाकरे सेनेचे सिद्धार्थ खरात यांचे आव्हान आहे. बुलढाण्यात शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांच्यासमक्ष विधानसभा लढतीसाठी नवख्या असलेल्या ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी आव्हान उभे केले आहे. विजयासाठी दोघांत काट्याची चुरस आहे.

हेही वाचा >>>Eknath Khadse Political Retirement : एकनाथ खडसे यांचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत

मलकापूरमध्ये भाजपचे चैनसुख संचेती आणि काँगेसचे राजेश एकडे या आजी-माजी आमदारांतील लढत यंदाही काट्याची ठरली. खामगावमध्ये भाजपचे आमदार आकाश फुंडकर आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यात तीव्र चुरस आहे. वंचित, बसप आणि अपक्षांमुळे होणारे मतविभाजन येथे कळीचा मुद्दा ठरेल. चिखलीमध्ये असेच चित्र असून भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि काँग्रेसचे राहुल बोन्द्रे यांच्यात थेट लढत आहे. जळगावमध्ये भाजपचे आमदार संजय कुटे आणि काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्यातच मुख्य सामना आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डीक्कर यांनी जोरदार हवा निर्माण केली असून वंचितचे प्रवीण पाटीलही बऱ्यापैकी मते घेतील, असे चित्र आहे.

हेही वाचा >>>अजित पवारांनी विदर्भातील स्वपक्षाच्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडले का? एकही प्रचार सभा नाही, कार्यकर्ते सैरभैर

मैत्रीपूर्ण संघर्ष

सिंदखेडराजामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि अजितदादा गटाचे मनोज कायंदे यांच्यात शेवटपर्यंत तिरंगी झुंज पहावयास मिळाली. या मैत्रीपूर्ण संघर्षात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 buldhana mahayuti vs maha vikas aghadi direct contest while friendly fight in sindkhed raja print politics news amy