छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेतील फुटीनंतर ‘ निष्ठावान’ अशी ओळख शिवसैनिकांमध्ये असणाऱ्या उदयसिंह राजपूत यांच्यासमोर या वेळी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आव्हान निर्माण केले आहे. उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात फुटीनंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आव्हान उभे केले होते. जिल्हा वार्षिक आराखाड्यातील निधीपासून ते विकासकामात राजपूत यांना मागच्या ओळीत ठेवणाऱ्या शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षाच्या नेत्यांवर मात करण्यासाठी उदयसिंह राजपूत यांची ‘ निष्ठावान’ प्रतिमा त्यांना तारेल काय, याची उत्सुकता कन्नड मतदारसंघात आहे. ओबीसी आणि मराठा दोन्ही बाजूने मतदाना दरम्यान त्रिभंग असल्याने नेते आणि मतदार या दोघांसमोर नवे पेच निर्माण करत कन्नडची निवडणूक गंमतीशीर वळणावर पोहचली आहे.

हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव हे विभक्त असल्याचे त्यांच्या शपथपत्राही आता नमूद करण्यात आले आहे. संजना जाधव यांना महायुतीचे उमेदवारी मिळावी यासाठी रावसाहेब दानवे प्रयत्नशील होते. शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षातून त्यांना प्रवेश आणि उमेदवारी एकाच दिवशी दिल्यानंतर रावसाहेब दानवे हे या मतदारसंघात प्रचार करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सभेतही त्यांनी या मतदारसंघात आवर्जून हजेरी लावली. उदयसिंह राजपूत ओबीसी. संजना जाधव, हर्षवर्धन जाधव आणि जरांगे पाटील यांचे समर्थक म्हणून काम करणारे पण अर्ज काढून घ्या असे म्हटल्यानंतरही अपक्ष रिगणात उभे असणारे उमेदवार मनोज पवार हे तिघे मराठा उमेदवार. त्यामुळे मराठा मतांमध्ये विभागणी होईल आणि उदयसिंह राजपूत यांना लाभ मिळेल असे सरधोपट वाटणारे गणित जरांगे यांच्या भूमिकेमुळे बदलते. आरक्षण विरोधात उभे ठाकणाऱ्याला मतदान करू नका असा आदेश मानायचा ठरले तर महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांना मतदान करता येणार नाही, असे मराठा मतदार मानतात. त्यानंतर उरतात दोन पर्याय, हर्षवर्धन जाधव आणि मनोज पवार. हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी राजीनामा दिला होता. पण ते कधी काय करतील याचा नेम सांगता येत नाही, अशी मतदारांमधील भावना. मनाेज पवार यांनी त्यांना अर्ज काढून घेण्यास सांगूनही ते रिंगणात उभे. त्यामुळे त्यांना मदत करण्यावरुनही संभ्रम. उदयसिंह राजपूत यांना ओबीसी म्हणून मराठा माणसाने मतदान कसे करावे, असाही पेच. त्यामुळे जातीच्या आधारे मतदानाची सारी गणिते बिघडतात. मग विकासकामांचा निकष म्हणून मतदान होईल का, या प्रश्नावर कन्नडची मंडळी पुन्हा पेचात. जे या तालुक्यात साखर कारखाना चालवतात ते राेहीत पवार कन्नड तालुक्यात राजकारणापासून चार हात लांब.

Dhananjay munde latest marathi news
भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly election 2024 shrirampur ahmednagar assembly constituency mahayuti ajit pawar ncp vs shivsena shinde group
श्रीरामपुरमध्ये महायुतीतील अंतर्गत बेबनाव उघड
maharashtra vidhan sabha election 2024 shahapur assembly constituency sharad pawar ncp vs ajit pawar ncp
अजित पवारांचे दरोडा शिवसैनिकांना नकोसे
Warora constituency, chandrapur district, One party worker died, Congress candidate non vegetarian banquet program
काँग्रेस उमेदवाराच्या मांसाहार पार्टीत एकाचा मृत्यू
HM Shri Amit Shah addresses public meeting in Shirala
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर इच्छुक; अमित शहा
yavatmal case registered against bjp worker
यवतमाळ : कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, भाजप कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हा
BJPs stance of not promoting Nawab Malik says pravin darekar
नवाब मलिकांचा प्रचार न करण्याची भाजपची भूमिका

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण

हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी विभक्त होण्यापूर्वी संजना जाधव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्यांच्याकडून पराभूत झाल्या त्या केतन काजे यांना निवडून आणण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी प्रयत्न केले. म्हणून हर्षवर्धन जाधव २०१९ च्या निवडणुकीमध्ये खैरे यांच्या विरोधात उभारले. ते केतन काजे फुटीनंतर शिवसेना ( एकनाथ शिंदे ) गटाकडे गेले. त्यांना शिवसेना शिंदे गटातून काढण्यात आले आहे. त्यामागे रावसाहेब दानवे असल्याच्या भावनेतून काजे यांचा हर्षवर्धन जाधव यांना असणारा विरोध मावळला आहे. मूळ पक्षात काम करणारी मंडळी त्या- त्या पक्षात काम करत नाहीत. नवाच माणूस आणि त्याच्या जातीचे तिसरेच गणित समोर येत असल्याने नवाच पेच कन्नडच्या मतदारांसमोर आहे. त्यामुळे ‘लागेल की माझी लॉटरी, ’ असे प्रत्येक उमेदवारास वाटत आहे. ज्या ओबीसी मतांवर उदयसिंह राजपूत यांची भिस्त आहे, त्यानांही बंजारा समाजातून विरोध असल्याचे सांगण्यात येते. नागद जिल्हा परिषदेमधील रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने एका महिलाचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज असणाऱ्या बंजारा समाजाचा रोष कमी करणे हे राजपूत यांच्यासमोरचे आव्हान असल्याचे सांगण्यात येते. महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांनाही भाजपचे ‘ ओबीसी ’ मतदान मिळेल असा दावा केला जातो. त्यामुळे ओबीसी मतांमध्येही फूट पडेल. या मतदारसंघात भिल्ल, ठाकर असे आदिवसी मतदानही लक्षणीय आहे. त्यामुळे त्यामुळे पेचातील मतदार आणि गुंत्यातील उमेदवार असे राजकीय पटलावरचे चित्र दिसून येत आहे.