चंद्रपूर : विकासकामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, विद्यार्थी प्रश्न, प्रदूषण, मानव-वन्यजीव संघर्ष, औद्योगिकीकरण, महिलांचे-युवकांचे प्रश्न, असे मूळ आणि ज्वलंत प्रश्न या निवडणुकीत झाकोळले; केवळ पैसा, भेटवस्तू, शाकाहारी व मांसाहारी जेवणावळ, मद्यपार्टी, यावरच प्रचारादरम्यान उमेदवारांचा भर दिसून आला. जात हा मुद्दाही चर्चेत राहिला.
जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, मोफत वीज, सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्ता भाव, लाडक्या बहिणींना दरमहा २१०० ते ३००० रुपये, यासोबतच समाजातील विविध घटकांना मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. उमेदवारांनी तसेच प्रचारासाठी आलेल्या ‘स्टार’ प्रचारकांनी जाहीर सभांमधून या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची हमी दिली. मात्र, स्थानिक समस्या व प्रश्न या निवडणूक प्रचारात मागे पडले.
हेही वाचा >>>कथित ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आवाज, सुप्रिया सुळे यांनी आरोप फेटाळले; आरोप करणाऱ्यांना नोटीस
जिल्ह्यात वीज केंद्रामुळे होणारे प्रदूषण हा ज्वलंत विषय आहे. मात्र, भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार वगळता एकाही उमेदवाराने हा विषय प्रचारात मांडला नाही. शहरवासीयांना प्रदूषणाचा भयंकर त्रास असतानाही येथील भाजप व काँग्रेस उमेदवारांनी यावर बोलणे टाळले. बेरोजगारी हा प्रमुख प्रश्न स्थानिक पातळीवर आहे. औद्योगिक नगरी असतानाही स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने युवकांमध्ये असंतोष वाढत आहे. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे ४० हजार कोटी रुपयांचा मित्तल कंपनीचा पोलाद प्रकल्प आणण्याची घोषणा केली. तसेच विकासकामे या एकाच मुद्यावर ते मतदारांना सामोरे गेले. मात्र, अन्य उमेदवार बेरोजगारी व रोजगार या विषयांवर बोललेच नाही.
जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष टीपेला पोहोचला आहे. ही समस्या संपूर्ण जिल्हावासीयांना भेडसावत आहे. मात्र, या विषयाला एकाही उमेदवाराने प्रचारादरम्यान हात घातला नाही. उद्योगांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर अधिग्रहित करण्यात आल्या. मात्र, याबाबत कोणत्याही उमेदवाराने ‘ब्र’ काढला नाही. गोंडवाना विद्यापीठासंदर्भात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. हाही मुद्दा प्रचारात ऐकू आला नाही.
हेही वाचा >>>शहरी भागात लोकसभेची पुनरावृत्ती टळली, मतदान केंद्राच्या विकेंद्रीकरणाचा सकारात्मक परिणाम
हे सर्व मूळ आणि ज्वलंत विषय बाजूलाच राहिले, तर सर्वच उमेदवारांनी खर्च केलेला बक्कळ पैसा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. महिला मतदारांना साडी-चोळी, लुगडी, पायातील चप्पल व एक हजार रुपये, असे भेटवस्तुंचे ‘पॅकेज’ एका उमेदवाराने दिले. काहींनी दिवाळी भेट म्हणून मतदार संघात भेटवास्तूंचे वाटप केले. क्रिकेट कीट, योगा ग्रूपसाठी साऊंड सिस्टिम, हार्मोनियम, कबड्डी व कुस्तिगीर यांना कीट, टीफिन बॉक्स, तसेच विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. बहुसंख्य मतदारसंघांत उमेदवारांकडून शाकाहारी व मांसाहारी जेवणावळ, मद्यपार्टी, यावर बक्कळ पैसा खर्च केला गेला. एका उमेदवाराने तर ऐका कॅटरिंग संचालकाला निवडणूक काळात दररोज किमान सात ते आठ ठिकाणच्या जेवणावळचे कंत्राट दिले होते.
शहरातील एका बिर्याणी सेंटरला दररोज विविध प्रभागांतील ग्रूपला बिर्याणी खाऊ घालण्याचे काम देण्यात आले होते. ग्रामीण भागांत ‘मटन’, ‘चिकन’चे हिस्से वाटप करण्यात आले.
एकंदरीत, काही अपवाद वगळता जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत निवडणूक प्रचारादरम्यान स्थानिकांना भेडसावणारे मूळ प्रश्न पूर्णत: झाकोळले, तर केवळ आणि केवळ काय‘द्या’चं बोला, हेच शब्द कानावर पडत होते!