यवतमाळ – जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात होत असलेली निवडणूक अखेरच्या टप्प्यात जातीय समिकरणांवर येवून पोहोचली आहे. महायुतीचे उमेदवार लाडकी बहीण व सरकारने लागू केलेल्या अन्य योजनांमुळे आपणच विजयी होवू असा दावा करत आहे. महाविकास आघाडीला शेतकरी, शेतमजूर, बेजरोजगार या घटकांसोबत बौध्द, मुस्लीम, आदिवासी, कट्टर शिवसैनिक हे मतदार तारून नेतील असा विश्वास आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मदन येरावार आणि महाविकास आघाडीचे बाळासाहेब मांगुळकर यांच्यात तुल्यबळ लढत आहे. शहरात वाढलेली गुन्हेगारी, अमृत पाणीपुरवठा योजना, शहरांतर्गत रस्त्यांची चाळण या स्थानिक मुद्यांवर भाजपची कोंडी झाली आहे. भयमुक्त यवतमाळ असा नारा देत महाविकास आघाडीने येथे जनमत बनविले आहे. प्रहारचे बिपीन चौधरी यांच्यासाठी कुणबी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. वंचित, बसपा हे घटक असले तरी यावेळी पक्षापेक्षा लोकांनीच ही निवडणूक हाती घेतल्याचे चित्र आहे. दिग्रस मतदारसंघात महायुतीचे संजय राठोड आणि महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्यात तुल्यबळ लढत आहे. हा बंजाराबहुल मतदारसंघ असल्याने येथे बंजारा मतेच निर्णायक ठरतील. कुणबी व इतर समाजावर महाविकास आघाडीची मदार आहे.
हेही वाचा >>> Amravati Assembly Constituency : अमरावतीत तिरंगी लढतीत कुणाची बाजी?
संजय राठोड मतदारसंघात केलेली विकासकामे दाखवत असताना महाविकास आघाडीकडे ठोस मुद्दे नाहीत. पुसद हा बंजाराबहुल मतदारसंघ नाईकांचा बालेकिल्ला आहे. महायुतीकडून ययाती नाईक तर महाविकास आघाडीकडून शरद मैंद लढत आहे. वचिंतकडून माधव वैद्य रिंगणत असल्याने आदिवासी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. बंजारा समाजाची साथ असल्याने नाईक घराण्याची परंपरा खंडीत होण्याची शक्यता कमी आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरखेडमध्ये महायुतीचे किसन वानखेडे व महाविकास आघाडीकडून साहेबराव कांबळे या दोन्ही नवीन उमेदवारांसह विजय खडसे (अपक्ष) व राजेंद्र नजरधने (मनसे) हे दोन माजी आमदारही रिंगणात आहेत. या मतदारसंघात कुणबी, मराठा समाजाची मते निर्णायक ठरतात. अमित शहांनी उमरखेडच्या सभेत मुस्लीमांना थेट टार्गेट केल्याने येथील समीकरणे बदलली आहेत.
आर्णी व राळेगाव हे दोन्ही अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहेत. आर्णीत महायुतीकडून ऐनवेळी भाजपात आलेले माजी आमदार राजू तोडसाम यांच्या विरूद्ध महाविकास आघाडीचे जितेंद्र मोघे यांच्यात थेट लढत आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले असले तरी तोडसाम यांच्या एंट्रीने समीकरणे बदलली आहेत. राळेगावमध्ये महायुतीचे प्रा. डॉ. अशोक उईके विरूद्ध महाविकास आघाडीचे प्रा. वसंत पुरके यांच्यात थेट लढत आहे. येथे काँग्रेस एकसंघपणे तर भाजप एकाकी किल्ला लढवत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. वणी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. महायुतीचे संजीवरेड्डी बोदकुरवार, महाविकास आघाडीचे संजय देरकर, मनसेचे राजू उंबरकर आणि अपक्ष संजय खाडे यांच्यात लढत आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मताधिक्य असले तरी यावेळी धनोजे कुणबी समाजातील मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. मनसेसुद्धा येथे निर्णायक ठरणार आहे.