चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून त्यांची यंग चांदा ब्रिगेड संघटना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर यात चांगलीच भर पडली आहे. जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार असून दोन्हीकडील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारादरम्यान एकमेकांना पाण्यात बघत आहेत.

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २०१४ मध्ये जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडची स्थापना केली. २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर या छोट्याच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. संघटनात्मक पातळीवर व्याप वाढत गेला. शहरातील सर्व प्रभागात शाखा सुरू झाल्या. स्वतंत्र कार्यकारिणी, पदाधिकारी, महिला संघटन, युवक, युवती संघटन, अशा पद्धतीने वटवृक्ष बहरले. आज यंग चांदा ब्रिगेडचे महिला संघटन जिल्ह्यात सर्वात प्रभावी ठरले आहे. संघटनेचा व्याप वाढल्यानंतर जोरगेवार यांनी भविष्यातील तरतूद म्हणून राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली. आता अपक्ष निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा करित जोरगेवार यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अशी विविध पक्षांची दारे ठोठावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या आशीर्वादाने भाजपत प्रवेश केला. जोरगेवार यांच्या प्रवेशापासून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात शितयुद्ध सुरू झाले.

yavatmal election
मतांचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर? यवतमाळात सर्वच मतदारसंघात काट्याच्या लढती
mahayuti mahavikas aghadi
वाढलेले मतदान कुणाच्‍या खात्‍यात? महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये…
maharashtra vidhan sabha election 2024 south west nagpur constituency and kamthi constituency voting percentage increases
दिग्गजांच्या मतदारंघातील वाढलेले मतदान कोणाच्या पत्थ्यावर ?
maharashtra vidhan sabha election 2024 chandrapur assembly constituency main original burning topics left side and candidate focusing on money gifting and other things
मूळ प्रश्न झाकोळले, फक्त काय‘द्या’चं बोला!
supriya sule denied bitcoin scam
कथित ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आवाज, सुप्रिया सुळे यांनी आरोप फेटाळले; आरोप करणाऱ्यांना नोटीस
urban area voter turnout
शहरी भागात लोकसभेची पुनरावृत्ती टळली, मतदान केंद्राच्या विकेंद्रीकरणाचा सकारात्मक परिणाम
Vidarbha vidhan sabha election 2024
विदर्भात हिंसक घटना, रोकडही जप्त; सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ५८ टक्के मतदानाची नोंद
Devendra fadnavis mohan bhagwat meeting
फडणवीस-मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट
Maharashtra vidhan sabha election Haryana pattern
राज्यात मतविभागणीचे ‘हरियाणा प्रारूप’?

आणखी वाचा-गेवराईत नात्या-गोत्यांमध्येच प्रमुख लढत

यंग ब्रिगेडमधील अनेकांना जोरगेवार यांचा भाजप प्रवेश पचणी पडला नाही, तर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही जोरगेवार नकोसे वाटते. त्यामुळे विधानसभा निवडणूक प्रचाराच्यादरम्यान अनेक वेळा भाजप व यंग चांदा ब्रिगेड यांच्यातील मतभेद दिसून आलेत. विशेष म्हणजे, जोरगेवार यांनी अद्यापपर्यंत यंग चांदा ब्रिगेड भाजपत विलिन केली नाही. त्यामुळे भाजप पदाधिकारी अस्वस्थ आहेत. त्याला कारण जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदारानेदेखील अशाच पद्धतीने स्वत:ची स्वतंत्र संघटना उभी केली होती. त्या आमदाराने भाजपत प्रवेश केला, मात्र संघटना विलीन केली नाही. आमदार झाल्यानंतर त्यांनी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे देण्याऐवजी स्वत:च्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनाच दिली. नगराध्यक्ष, सभापती, तसेच जिल्हा परिषदेतही महत्त्वाची पदे दिली. आता जोरगेवार यांच्याबद्दलही भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये ही भीती आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेच्या माध्यमातून ही बाब प्रकर्षाने समोर आली. या जाहीर सभेच्या पासेसवरून भाजप व यंग चांदाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मारामारीची वेळ आली. भाजपच्या अनेक महिला, माजी नगरसेवकांनी पास मिळाले नाही म्हणून घोषणाबाजी केली. भाजप पदाधिकारी म्हणतात, यंद चांदा ब्रिगेडकडे पासेसची जबाबदारी होती, तर यंग चांदा ब्रिगेडने भाजपकडे पासेसची जबाबदारी होती, असे सभास्थळी सांगितले.

आणखी वाचा-निलंग्यात गुंडगिरी, दहशतीवरून आरोप प्रत्यारोप

जिल्हा भाजपचे संघटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गटाकडे आहे. मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. असे असतानाही जोरगेवार यांनी फडणवीस यांच्यासमक्ष मुनगंटीवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मुनगंटीवार समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. या नाराजीतून भाजप व यंग चांदा ब्रिगेडमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. बूथ रचनेत भाजप पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडची स्वतंत्र चमू सक्रिय आहे. यामुळेही भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत.