सांगली : राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे मिरज विधानसभा मतदार संघातून यावेळी चौथ्यांदा विधानसभेत जाण्याच्या प्रयत्नात असताना महाविकास आघाडीतील उमेदवारीचा अखेरपर्यंत सुरू राहिलेला खेळखंडोबा पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. २००९ पासून मिरजेत त्यांना संघटित विरोधकांचा अभाव आणि राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यातून होत असलेली छुपी मदत ही त्यांच्या सातत्यपूर्ण विजयाची खात्री देत आली आहेत. यावेळी महाविकास आघाडीतून शिवसेना (ठाकरे) गटाकडून तानाजी सातपुते यांना उमेदवारी मिळाली असली तरी आघाडीअंतर्गत उमेदवारीसाठी गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेली साठमारी खाडे यांना लाभदायी ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपपेक्षा खासदार विशाल पाटील यांना २५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. या ताकदीवर यावेळी विधानसभा निवडणुकीत मविआला चांगले वातावरण आहे असे वाटत असताना मिरजेची जागा कुणाला यावरून महिनाभर रणकंदन माजले होते. खानापूरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्यानंतर जिल्ह्यात किमान एक तरी जागा शिवसेना (ठाकरे) गटाला मिळावी अशी मागणी झाली आणि मेरीटवर जागा वाटप या धोरणाला तिलांजली दिली गेली. राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसने मिरजेत हाराकिरी केली असेच म्हणावे लागेल. खाडे यांना रोखण्यासाठी संघटित प्रयत्न होतील असे वाटत असतानाच मविआमधील हाराकिरी भाजपला अनुकूल दान देणारी सध्या तरी ठरली आहे.

maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान

आणखी वाचा-वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार

लोकसभा निवडणुकीत भाजपचे कमी झालेले मतदान लक्षात येताच खाडे यांनी मतदार संघ पिंजून काढला. गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी पालकमंत्री असतानाही मतदार संघात तळ ठोकून लोकसभेवेळी बाजूला गेलेल्यांना आपल्याकडे वळविण्यात प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गाव पातळीवरच नव्हे तर अगदी वाडी वस्तीवर जाउन साखरपुडा, बारसे, वास्तुशांती या साध्या कार्यक्रमापासून ते लग्न विधीपर्यंत हजेरी लावली. एखाद्या आठवड्यात मंत्रीमंडळाची बैठक असेल तर त्यांनी मुलगा अथवा पत्नी यांना पाठवून आपला गड मजबूत ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. या दरम्यान, त्यांचे संभाव्य विरोधक मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवाारीची आशा निर्माण केली होती. मात्र, जिल्हा नेत्यांनी मिरजेची जागाच पक्षाकडे मागितली नव्हती असा गंभीर आरोप काँग्रेसचे इच्छुक सी. आर. सांगलीकर यांनी केला आहे. यावरून या निवडणुकीसाठी मातब्बर असलेले आणि ताकदवान पक्षांने ही जागा भाजपला आंदणच द्यायची निश्‍चित केलीी होती की काय अशी शंका येते. खाडे यांनीही काही दिवसापुर्वी विरोधी उमेदवार मीच ठरवतो, काँग्रेस नेते आपणास विचारूनच उमेदवार देतात असे जाहीरपणे सांगितले होते. यावेळीही हीच स्थिती आहे का अशा शंका व्यक्त होत आहेत.

आणखी वाचा-‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका

शिवसेना ठाकरे पक्षाची ताकदच मुळी तोळामासा. ना एखादा ग्रामपंचायत सदस्य, ना नगरसेवक, ना एखादी संस्था अशी असताना २०१४ च्या निवडणुकीत जागा लढवली होती. यावर जागेचा हट्ट कायम ठेवत उमेदवारी पदरात पाडून घेतली. मात्र, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ ८ हजार मते मिळाली होती. पराभूत उमेदवाराच्या १० टक्केही मतदान झालेले नव्हते. मग महाविकास आघाडीत मेरीटच्या आधारे जागा वाटप करण्याचे मनसुबे याठिकाणी खुंटीला टांगत जागा वाटप झाले का असा प्रश्न निर्माण होतो. जागा वाटपानंतर आघाडीतील घटक पक्षांचे मनोमिलन करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष प्रचारात याचे चित्र का उमटू शकले नाही. प्रचाराचा शुभारंभ आमदार जयंत पाटील, खा. विशाल पाटील,नितिन बानुगडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शिवसेनेचा प्रचार बाजूलाच राहिला, मात्र, आमदार-खासदारांमधील शब्दच्छलच रंगला. खासदार पाटील यांची मिरजेत आघाडीला पाठबळ तर सांगलीत बंडखोरीला पाठबळ अशी दुटप्पी भूमिका यावेळी समोर आली. मिरजेतील काँग्रेस नेत्यांना सांगलीतील बंडखोरीची अधिक काळजी असल्याचे दिसते. यामुळे त्यांचे मन मिरजेत आघाडीसाठी जितके झुरते त्यापेक्षा कैक पटीने सांगलीत गुंतले आहे.