मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते पराभूत झाले. यात काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या अतुल भोसले यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. तर संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांना भाजपच्या अतुल खताळ यांनी पराभूत केले. विदर्भात तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर पराभूत झाल्या. पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघात अनपेक्षितपणे काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शंकर मांडेकर यांनी पराभव केला.

हेही वाचा : कोकण: कोकण, ठाण्यात महायुतीचे वर्चस्व, शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईत शिंदे गट वरचढ

याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बाळासाहेब पाटील यांचा भाजपच्या मनोज घोरपडे यांनी कराड उत्तर मतदारसंघात पराभव केला. मुंबईतील माहीम मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या सदा सरवणकर यांना चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या महेश सावंत यांनी पराभवाचा धक्का दिला. येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. उत्तर महाराष्ट्रात मुक्ताईनगरात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या. तर, मनसेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद (राजू) पाटील यांना कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला आहे.