अमरावती : महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा यांनी थेट मैदानात उतरून प्रचार केल्‍याने महायुतीत संघर्ष टोकदार बनलेला असताना आता अभिजीत अडसूळ यांनी महायुतीच्‍या नेत्‍यांची छायाचित्रे वापरल्‍याबद्दल युवा स्‍वामिभान पक्षाच्‍या उमेदवाराविरूद्ध उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली आहे.

युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांनी स्‍वत:च्‍या प्रचार फलकांवर महायुतीच्‍या नेत्‍यांचे छायाचित्रे वापरल्‍याचा आक्षेप अभिजीत अडसूळ यांनी घेतला आहे. अभिजीत अडसूळ यांनी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली असून या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी अमरावती, दर्यापूर मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांना प्रतिवादी केले आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

हेही वाचा >>>सिंदखेडराजाच्या आखाड्यात दोन मित्र समोरासमोर, ‘शत्रू’चेही आव्हान

याप्रकरणी अभिजित अडसूळ यांनी गेल्‍या ६ नोव्हेंबरला सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. अहवालानुसार संबंधित उमेदवाराकडून आदर्श आचारसंहितेचा भंग होत नसल्याचे दिसून येते, असे पत्र महायुतीचे  उमेदवार अभिजित अडसूळ यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ९ नोव्हेंबरला दिले. अभिजित अडसूळ यांनी या पत्राचा आधार घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे.

गेल्‍या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनी भाजपच्‍या नवनीत राणा यांच्‍या विरोधात उघड भूमिका घेतली होती. अडसूळ पिता-पुत्र आणि राणा दाम्‍पत्‍यातील संघर्ष गेल्‍या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या निवडणुकीत दर्यापूर मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी नवनीत राणा यांनी आग्रह केला होता, पण अखेरीस ही जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला मिळाली. महायुतीत असूनही रवी राणा यांनी दर्यापूर मतदारसंघातून युवा स्‍वाभिमान पक्षाची उमेदवारी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना दिली. महायुतीतील या फुटीचा फटका बसण्‍याची शक्‍यता लक्षात घेता, अडसूळ यांनी महायुतीच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना या प्रकरणात हस्‍तक्षेप करण्‍याची विनंती केली. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी राणा यांना समज दिली. तरीही त्‍याला न जुमानता राणा दाम्‍पत्‍याने अडसूळ यांना विरोध सुरूच ठेवला.

हेही वाचा >>>२७ मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढतींचे ‘मविआ’समोर आव्हान

रमेश बुंदिले यांच्‍या प्रचार फलकांवर भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आणि खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपचे अकोटचे उमेदवार प्रकाश भारसाकळे यांनी छायाचित्रे वापरण्‍यात आली होती. तसेच प्रचारादरम्‍यान भाजपचे झेंडे वापरण्‍यात आले, असा आक्षेप अडसूळ यांनी नोंदविला होता.

गेल्‍या काही दिवसांत नवनीत राणा यांनी रमेश बुंदिले यांच्‍या प्रचारात स्‍वत:ला झोकून दिले. काही दिवसांपुर्वी खल्‍लार येथील प्रचारसभा आटोपल्‍यानंतर खुर्च्‍यांची फेकाफेक करण्‍यात आली, हा मुद्दा चांगलाच गाजला. आता राणा दाम्‍पत्‍य आणि अडसूळ पिता-पुत्र यांच्‍यात संघर्ष आणखी पेटण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Story img Loader