Devendra Fadnavis: मतटक्का वाढण्यामागे ‘लाडकी बहीण’, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत

वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात महायुती व मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

dcm Devendra fadnavis ladki bahin yojana
Devendra Fadnavis: मतटक्का वाढण्यामागे ‘लाडकी बहीण’, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद मतदानाची टक्केवारी वाढण्याल्या कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात महायुती व मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : राज्यभरात निवडणुकीशी संबंधित १५९ गुन्हे

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
nitin gaikwad contesting election Deputy Chief Minister Devendra Fadnavis Nagpur South West Assembly constituency
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चक्क ‘क्रेन ऑपरेटर’; खात्यात केवळ दोन हजार रुपये, दीड लाखांवर कर्ज…

गुरुवारी दुपारी फडणवीस मुंबईला रवाना झाले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सगळीकडे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वाढलेल्या टक्केवारीचा नेहमीच भाजपला फायदा झाला आहे. या निवडणुकीत महिलांची टक्केवारीही वाढली आहे. अनेक ठिकाणी फोन करून माहिती घेतली, जवळपास २५ ते ३० बुथवर मी चौकशी केली. त्यातून टक्केवारी वाढल्याचे समोर आले आहे, असेही फडणवीस म्हणाले. काही अपक्षांशी संपर्क साधला का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, अद्याप आम्ही संपर्क साधलेला नाही. मुख्यमंत्री पदाबाबतही कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबतचा निर्णय निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांना समजेल. ‘एक्झिट पोल’वरील आकड्यांबाबत पक्षाचे प्रवक्ते बोलतील, असेही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 dcm devendra fadnavis ladki bahin yojana leads to increased voter turnout print politics news css

First published on: 22-11-2024 at 01:30 IST

संबंधित बातम्या