नागपूर : लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद मतदानाची टक्केवारी वाढण्याल्या कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात महायुती व मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : राज्यभरात निवडणुकीशी संबंधित १५९ गुन्हे

गुरुवारी दुपारी फडणवीस मुंबईला रवाना झाले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सगळीकडे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वाढलेल्या टक्केवारीचा नेहमीच भाजपला फायदा झाला आहे. या निवडणुकीत महिलांची टक्केवारीही वाढली आहे. अनेक ठिकाणी फोन करून माहिती घेतली, जवळपास २५ ते ३० बुथवर मी चौकशी केली. त्यातून टक्केवारी वाढल्याचे समोर आले आहे, असेही फडणवीस म्हणाले. काही अपक्षांशी संपर्क साधला का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, अद्याप आम्ही संपर्क साधलेला नाही. मुख्यमंत्री पदाबाबतही कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबतचा निर्णय निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांना समजेल. ‘एक्झिट पोल’वरील आकड्यांबाबत पक्षाचे प्रवक्ते बोलतील, असेही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 dcm devendra fadnavis ladki bahin yojana leads to increased voter turnout print politics news css