नागपूर : २३ नोव्हेंबर हा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस ठरला. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा दिवस तर कधीही न विसरणारा आहे. पाच वर्षांपूर्वी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह पहाटेचा शपथविधी उरकत सरकार स्थापन केले आणि केवळ ८० तासांत हे सरकार कोसळले. फडणवीसांवर नामुष्की ओढवली. याच पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीसांचे राजकारण संकटात असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र नियतीने फडणवीस यांना स्वत:चे महत्त्व सिद्ध करण्यासाठी २३ नोव्हेंबरचीच तारीख दिली. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकट्या भाजपने १२५ हून अधिक मतदारसंघांत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२३ नोव्हेंबरला काय घडले होते?

२३ नोव्हेंबर २०१९ ची सकाळ राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी धक्कादायक होती. अत्यंत गोंधळाच्या स्थितीत निर्माण झालेले सरकार अल्पावधीत कोसळले. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या नव्या सरकारला पाठिंबा देण्यास विरोध केला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करता न आल्याने त्यांचे सरकार अवघ्या ८० तासांत कोसळले होते.

हेही वाचा :विधिमंडळातील मनसेचे अस्तित्व संपुष्टात

‘मी पुन्हा येईन २.०’

फडणवीस यांच्या या कामगिरीला समाजमाध्यमांवर ‘मी पुन्हा येईन २.०’ म्हणून संबोधित केले जात आहे. निवडणुकांपूर्वी भाजपची परिस्थिती फार वाईट असल्याचे भाकीत वर्तवले जात होते. मात्र भाजपने निवडणुकीच्या निकालात सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वत:ला सिद्ध केले. या महाविजयानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राज्यात आहे. सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या जल्लोषातही ही मागणी प्रकर्षाने केली जात आहे.