घनसांवंगी

जालना : आतापर्यंत सलग पाच निवडणुकीत विरोधकांचे आव्हान परतवून लावत विजयी होणारे राजेश टोपे (राष्ट्रवादी-शरद पवार) यांच्याविरुद्ध घनसावंगी मतदारसंघातील सर्वच उमेदवारांनी प्रचाराची राळ उठविली आहे. त्यामुळे टोपेंविरुद्ध सारे, अशी ही निवडणूक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

घनसांवगी, अंबड आणि जालना या तीन तालुक्यांतील २११ गावे आणि तांडे, वाड्या-वस्त्या असलेल्या या मतदारसंघात ऊसगाळपाशी संबंधित तीन उमेदवार आहेत. मागील ४०-४५ वर्षांपासून कार्यान्वित असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्यांचे पाठबळ टोपे यांच्या पाठीशी आहे. समर्थ आणि सागर कारखान्यांनी गत गळीत हंगामात पंधरा-सोळा लाख टन उसाचे गाळप केले होते. या मतदारसंघातील जायकवाडी लाभक्षेत्रातील उसउत्पादक पट्ट्यानेच मागील निवडणुकीत टोपे यांना तारले होते. टोपे यांच्या विरोधातील डॉ. हिकमत उढाण (शिवसेना-शिंदे) आणि सतीश घाटगे (अपक्ष) यांनी आपल्या प्रचारात उस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा प्रचारात आणलेला आहे. डॉ. उढाण यांचा गूळ पावडर तयार करणारा खासगी उद्याोग असून त्याच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सतीश घाटगे यांचाही खासगी साखर कारखाना मतदारसंघात आहे. डॉ. उढाण आणि घाटगे या दोघांनी साखर कारखाना आणि ऊस उत्पादकांच्या हिताच्या मुद्द्यावरून प्रचारात टोपे यांच्यावर आरोप केलेले आहेत. अपक्ष उमेदवार माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनीही उसउत्पादकांच्या विषयावर प्रचारात उडी घेतली आहे. कारखानदार उसाच्या मोजमापात घोटाळा करतात, अशी शंका चोथे यांच्या प्रचारातून ध्वनित होत आहे. टोपे यांचा दोन साखर कारखाने, समर्थ सहकारी बँक, शिक्षण संस्था इत्यादींच्या माध्यमातून व्यापक संपर्क असला तरी त्यांच्या विरोधात असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी

हेही वाचा:लक्षवेधी लढत: शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वादाचा दुसरा अंक

करोनाकाळात आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. मुंबई व राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला होता. त्याबद्दल देशात टोपे यांची चांगली प्रतिमा झाली होती. मतदारसंघात ही प्रतिमा किती कामाला येते हे निवडणुकीतच समजेल.

निर्णायक मुद्दे

● साखर कारखान्यांतील व्यवस्थापनात काही चुका झाल्या की, त्याचा फटका निवडणुकीत बसतो. उसाच्या राजकारणात नफ्यातील कारखाना चालविणारे राजेश टोपे यांचा कारभार काटकसरीचा असल्याची चर्चा नेहमी असते.

हेही वाचा:लक्षवेधी लढत: मुख्यमंत्र्यांना दिघेंच्या कुटुंबातून आव्हान

● मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेले आंतरवाली सराटी हे गावही याच मतदारसंघात आहे. जरांगे यांच्या उपोषणाच्या वेळी टोपे यांची उपस्थिती त्यांना राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती – ५९,६५६ ● महाविकास आघाडी – ८९,९१४